(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maruti घेऊन येत आहे नवीन Electric Car, जाणून घ्या कधी होणार लॉन्च
Upcoming Maruti Electric Car: देशात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वाढू लागली आहे. हेच लक्षात घेता अनेक दिग्गज वाहन निर्माता कंपनी आपले वाहन अपडेट करून इलेक्ट्रिक स्वरूपात बाजारात उतरवत आहे.
Upcoming Maruti Electric Car: देशात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वाढू लागली आहे. हेच लक्षात घेता अनेक दिग्गज वाहन निर्माता कंपनी आपले वाहन अपडेट करून इलेक्ट्रिक स्वरूपात बाजारात उतरवत आहे. यातच आता आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार असल्याची बातमी समोर येत आहे. मारुतीची ही इलेक्ट्रिक कार कशी असेल, यात कंपनी कोणते फीचर्स देऊ शकते आणि ही कार कधी लॉन्च होणार, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.
मारुतीने देशांतर्गत कार बाजारात अद्याप इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश न करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इलेक्ट्रिक कारची मर्यादित मागणी. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी बाजारात वाढल्यानंतर कंपनीने या सेगमेंटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी मारुतीची ही कार बाजारात येण्यासाठी ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पाहता कंपनी बजेट इलेक्ट्रिक कार आणण्याची शक्यता आहे.
2025 मध्ये लॉन्च होऊ शकते मारुतीची इलेक्ट्रिक कार
एका रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी 2025 पर्यंत आपली पूर्णपणे इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकते. कंपनी आधी ही कार भारतात लॉन्च करेल, त्यानंतर ती जपान, युरोपमध्ये लॉन्च करेल. पण कंपनीने या कारच्या ग्लोबल लॉन्चसाठी भारताची निवड केली आहे. मारुतीच्या या कारबद्दल असा अंदाज वर्तवला जात आहे की, ही कार वॅगन-आर सारखीच असू शकते आणि त्यात बरेच बदल केले जाऊ शकतात. मारुतीची वॅगन-आर कार टेस्टिंग दरम्यान अनेकदा दिसली आहे. अशातच कंपनी या कारसह इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करू शकते, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर ही कार अनेक बदलांसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक सेगमेंटमधील उर्वरित कारशी स्पर्धा करण्यासाठी मारुती इतर कंपन्यांसोबत बॅटरी प्लांट उभारण्यात गुंतलेली आहे. जेणेकरून ती आयात करावी लागणार नाही. असं झाल्यास कंपनी कमी किंमतीत ही कार लॉन्च करू शकते.
Hyundai Ionic 5N
Hyundai ही इलेक्ट्रिक कार 2023 मध्ये लॉन्च करू शकते. याशिवाय Hyundai आणखी दोन इलेक्ट्रिक कारवर काम करत आहे.
टाटा अल्ट्रोझ ईव्ही
टाटा मोटर्स लवकरच आणखी एक इलेक्ट्रिक कार, Tata Altroz लॉन्च करू शकते. याशिवाय कंपनीची 2026 पर्यंत 10 इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची योजना आहे.