Grand Vitara : आकर्षक लूक, दमदार फिचर्स आणि जबरदस्त मायलेजसह ग्रॅड विटारा या महिन्यात होणार लॉन्च; वाचा संपूर्ण रिव्ह्यू
Maruti Suzuki Grand Vitara : ग्रॅंड विटाराच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार दिसायला खूप आलिशान आहे आणि तिचे शो लाईट्स कारचा लूक अधिक आकर्षक करतात.
Maruti Suzuki Grand Vitara : दिग्गज वाहन कंपनी मारूती सुझुकी (Maruti Suzuki) आपली नवीन कार ग्रॅंड विटारा (Grand Vitara) या महिन्याच्या अखेरीस लॉन्च करणार आहे. 11 जुलैपासून या कारचे बुकिंग सुरु झाल्यानंतर 8 सप्टेंबरपर्यंत जवळपास 50 हजारांहून अधिक ग्राहकांनी या कारची बुकिंग केली होती. या कारचा वाढता प्रतिसाद पाहता ग्रॅड विटारामध्ये नेमकं काय खास आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
ग्रॅंड विटाराचा लूक कसा आहे?
ग्रॅंड विटाराच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार दिसायला खूप आलिशान आहे आणि तिचे शो लाईट्स कारचा लूक अधिक आकर्षक करतात. याला समोरील बाजूस एक मोठी लोखंडी जाळी मिळते जी स्प्लिट हेडलॅम्प ट्रीटमेंट डिझाईनमध्ये उत्तम प्रकारे समतोल साधते, या डिझाईनमुळे ही SUV इतर कारपेक्षा वेगळी दिसते. फ्लोटिंग रूफ आणि रुंद टेल-लॅम्पमुळे ही SUV खूपच रुंद दिसते. हेडलॅम्प सिग्नेचर, स्क्वेअर एलिमेंट्स आणि एकूणच आकारामुळे वेगळ्या लूकसह, ही एसयूव्ही टोयोटा हायरायडरसारखीच आहे.
ग्रॅंड विटाराचे इंटीरियर कसे आहे?
ग्रँड विटारा अधिक प्रीमियम आहे. काही कारचे मॉडेल इंटीरियर कंपनीच्या इतर गाड्यांसारखेच आहेत. परंतु, त्याचा सॉफ्ट टच डॅशबोर्ड, सिल्व्हर हायलाईट्ससह लेदर सीट्स केबिनला प्रिमियम लूक देतात. या कारमध्ये वापरण्यात आलेले पार्ट्स चांगल्या दर्जाचे आहे. माईल्ड हायब्रीड व्हेरिएंटला फुल हायब्रिड प्रमाणेच पूर्ण डिजिटल डायल मिळतो. या कारमध्ये नवीन 9-इंचाची टचस्क्रीन मारुती इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. जी या सेगमेंटला अधिक खास बनवते.
ग्रॅंड विटाराचे वैशिष्ट्ये काय?
या कारची सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे या कारला मोठे डबल पॅनल असलेले सनरूफ आहेत जे एक मोठे हायलाईट केलेले वैशिष्ट्य आहे. या कारमध्ये पॅडल शिफ्टर्स, 6 एअरबॅग्ज, व्हॉईस असिस्टंटसह कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, उत्तम दर्जाचा डिस्प्ले असलेला 360 कॅमेरा, अॅम्बियंट लायटिंग, क्लायमेट कंट्रोल अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. पण स्ट्राँग हायब्रिडमध्ये हवेशीर सीट आणि हेड-अप डिस्प्ले यांसारखी काही अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
इंजिन आणि मायलेज
या कारचे इंजिन 1.5 लीटर देण्यात आले आहे. जे 103 Bhp पॉवर जनरेट करते. हे टर्बो पेट्रोल इंजिन नाही, पण 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह ओव्हरटेकिंग आणि पार्ट थ्रॉटल रिस्पॉन्ससाठी उत्तम आहे. ही कार शहरी भागामध्ये चालविणे खूप सोपे आहे. जर तुम्ही ही कार आरामात चालवली तर तुम्हाला इतर SUV गाड्यांपेक्षा जास्त मायलेज मिळू शकेल. त्यामुळे, शहरात गाडी चालवताना या कारकडून 15 kmpl किंवा त्याहून अधिक मायलेज अपेक्षित आहे, जे इतर SUV कारच्या तुलनेत खूप जास्त आहे.
ग्रॅंड विटारामध्ये लूक्स, फिचर, कंन्फर्ट, स्मूथ गिअरबॉक्स यांसारखी उत्कृष्ट वैशिष्ट्य आहेत.
महत्वाच्या बातम्या :