(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Car : महिंद्रा XUV700 ला देशातील सर्वात सुरक्षित वाहनाचा पुरस्कार जाहीर; मिळाले 5 स्टार रेटिंग
mahindra xuv700 : ग्लोबल NCAP ने महिंद्रा XUV700 ला भारतातील सर्वात सुरक्षित कार म्हणून सन्मानित केले आहे. याआधीही 2020 मध्ये कंपनीला XUV300 साठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Mahindra XUV700 Safer Choice Award : कार घेताना नेहमी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? हे जर तुम्हाला माहित नसेल किंवा जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नवीन कार घेताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तुम्ही जी कार घेणार आहात ती किती सुरक्षित आहे याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. याचाच अर्थ कारचा सेफ्टी रेटिंग तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. सर्व कारची ग्लोबल NCAP द्वारे क्रॅश चाचणी केली जाते आणि त्यांना सुरक्षा रेटिंग दिले जाते, जेणेकरून त्या कारमध्ये प्रवास करणे किती सुरक्षित आहे हे तुम्हाला समजू शकेल. Mahindra XUV700 कारला ग्लोबल NCAP ने महिंद्रा XUV700 ला भारतातील सर्वात सुरक्षित कार म्हणून पुरस्काराने सन्मानित केले आहे.
वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने जाहीर केले आहे की, त्यांच्या XUV700 SUV ला भारतातील सर्वात सुरक्षित कार म्हणून ग्लोबल NCAP 'सेफर चॉईस' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्लोबल NCAP च्या #SaferCarsForIndia मोहिमेत चाचणी केलेल्या सर्व कारमध्ये Mahindra XUV700 ला सर्वोच्च एकत्रित प्रवासी सुरक्षा रेटिंग देण्यात आले आहे, असे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महिंद्रा अँड महिंद्राने पुढे सांगितले की, XUV700 ला प्रौढ रहिवासी संरक्षणासाठी 5-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग आणि लहान मुलांच्या संरक्षणासाठी 4-स्टार रेटिंग मिळाले आहे. महिंद्राने हे विजेतेपद दोनदा पटकावले आहे. यापूर्वी महिंद्रा XUV300 हे कंपनीचे पहिले वाहन होते, ज्याला 2020 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता, तर आता XUV700 ला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
When you put safety first, safety puts you first too! Our seamless win for the second time after Mahindra XUV300 is a testimony to that. Thank you @GlobalNCAP for recognising us as the ‘Safer Choice’ 2022.#SaferCarsForIndia #XUV700 #HelloXUV700 #GNCAPSaferChoice pic.twitter.com/9jZGqap7Rp
— MahindraXUV700 (@MahindraXUV700) June 23, 2022
Mahindra XUV700 च्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची पुष्टी करण्यात आली आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, "जेव्हा तुम्ही सुरक्षिततेला प्रथम स्थान देता, तेव्हा सुरक्षा देखील तुम्हाला प्रथम स्थान देते! महिंद्र XUV300 नंतर दुसऱ्यांदा आमचा विजय हा त्याचा पुरावा आहे. ग्लोबल NCAP आम्हाला 'सेफर चॉईस' 2022 म्हणून ओळखण्यासाठी धन्यवाद."
महिंद्रा XUV700 अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स (ADAS) सह सुसज्ज आहे ज्यामध्ये अहेड कोलिजन वॉर्निंग, कॅमेरा आणि रडार वापरून ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेक, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि स्मार्ट पायलट असिस्ट आहेत. यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन (EBD) सारखी वैशिष्ट्ये देखील मिळतील.
महत्वाच्या बातम्या :