Car : Mahindra XUV400, Tata Nexon की MG ZS कोणती कार सर्वात भारी? वाचा A to Z माहिती
Mahindra XUV400 vs Tata Nexon : Mahindra XUV400 ही कार Tata Nexon EV Max आणि MG ZS या कारशी स्पर्धा करणार आहे.
Mahindra XUV400 vs Tata Nexon EV Max vs MG ZS : सध्या इलेक्ट्रिक वाहनांची बाजारात मागणी वाढतेय. नुकतीच 8 सप्टेंबर रोजी Mahindra & Mahindra कंपनीची Mahindra XUV400 ही इलेक्ट्रिक कार (Electric Car) लॉन्च झाली. इलेक्ट्रिक वाहनांमधील Mahindra XUV400 ही कार Tata Nexon EV Max आणि MG ZS या कारशी स्पर्धा करणार आहे. याच निमित्ताने या तीन इलेक्ट्रिक वाहनांमध्ये नेमका कोणता फरक आहे याची तुलना आम्ही केली आहे.
कोणती कार सर्वात मोठी?
या इलेक्ट्रिक वाहनांच्या लांबीबद्दल बोलायचे झाल्यास, MG ZS ची लांबी सर्वात जास्त आहे. MG ZS कार लांबीने 4323mm आहे. तर, XUV400 ची लांबी 4200mm. या तुलनेत Nexon EV Max ची लांबी कमी आहे. Nexon EV Max ची लांबी 3993mm आहे. व्हीलबेसच्या बाबतीत XUV400 2600mm आहे, तर Nexon EV आणि MG ZS 2498mm/2581mm आहे.
कोणत्या इलेक्ट्रिक कारची रेंज चांगली?
XUV400 मध्ये 456km च्या रेंजसह 39.4kW बॅटरी पॅक आहे. EV Max ची रेंज 437km आहे. तर, ZS EV ची रेंज 461km आहे. बॅटरी पॅकच्या बाबतीत बघायचे झाल्यास, EV Max मध्ये 40.5kw बॅटरी पॅक आहे. तर, MG मध्ये 50.3kW बॅटरी पॅक आहे. या तिन्ही इलेक्ट्रिक कारचे वेगळे प्रकार आहेत.
कोणत्या कारचे फिचर्स जास्त आहेत?
Mahindra XUV400, Tata Nexon EV Max आणि MG ZS या तिन्ही इलेक्ट्रिक कारमध्ये सनरूफ, क्लायमेट कंट्रोल, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि यांसारखे बरेच अपडेटेड प्रीमीअम फिचर्स देण्यात आले आहेत. महिंद्राला OTA अपडेट्स मिळतात. तर, Nexon EV Max ला हवेशीर जागा आणि MG ला 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा आणि बरेच फिचर्स मिळतात. महिंद्रा आणि एमजी या दोन्ही कारला सहा एअरबॅग्स मिळतात.
किंमत किती?
Nexon EV Max ची किंमत 18.3 लाखांपासून सुरु होते ती 20.04 लाखांपर्यंत आहे. तर, MG ZS ची किंमत 21.99 लाखांपासून सुरु होते ती 25.88 लाखांपर्यंत आहे. महिंद्राच्या XUV400 ची किंमत मात्र पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये उघड होईल. किमतींच्या बाबतीत, XUV400 नेक्सॉन ईव्ही मॅक्सच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :