Mahindra & Mahindra च्या SUV XUV400 EV ची पहिली झलक; आनंद महिंद्रांकडून व्हिडीओ ट्वीट
Mahindra XUV400 EV Latest Update : महिंद्रा लवकरच आगामी SUV XUV400 EV लॉन्च करणार आहे.
XUV400 EV First Look : Mahindra & Mahindra च्या इलेक्ट्रिक SUV XUV400 चा फर्स्ट लूक समोर आला आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर ट्वीट करून महिंद्राच्या इलेक्ट्रिक SUV XUV400 ची पहिली झलक दिली आहे. महिंद्रा 8 सप्टेंबर 2022 रोजी ही बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक SUV लॉन्च करणार आहे.
आनंद महिंद्रानं ट्वीट करुन XUV400 EV चा पहिला लूक रिलीज केला आहे. ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "आजचा दिवस खूप शुभ आहे. त्यामुळे या निमित्तानं आम्ही आगामी एसयूव्हीची एक झलक दाखवणार आहोत. व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे की, महिंद्राची इलेक्ट्रिक SUV XUV400 8 सप्टेंबर रोजी लॉन्च होईल.
Today is a very auspicious day, so delighted to announce another curtain-raiser coming your way soon… pic.twitter.com/g0XG0wP3t0
— anand mahindra (@anandmahindra) August 31, 2022
महिंद्रानं यूकेमध्ये आपल्या आगामी इलेक्ट्रिक SUV प्रमोट करण्यासाठी एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ज्यामध्ये XUV 800, XUV 900 चा समावेश आहे. XUV 400 टेस्ट ड्राईव्ह सुरु आहे. महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेइकल हटके अंदाजात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
यापूर्वी जुलै 2022 मध्ये महिंद्राच्या स्कॉर्पिओच्या नवीन व्हर्जनला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. महिंद्राच्या SUP Scorpio-N साठी बुकिंग सुरु झाल्यानंतर 30 मिनिटांच्या आत, 1 लाख स्कॉर्पिओ गाड्यांचं बुकिंग करण्यात आलं. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बुक केलेल्या नवीन स्कॉर्पिओची एकूण किंमत 2.3 अब्ज डॉलर म्हणजेच, 18,000 कोटी रुपये इतकी आहे. देशातील कोणत्याही वाहनांचं बुकिंग करण्याचा हा नवा विक्रम आहे. कंपनीनं सांगितलं की, नवीन Scorpio-N ची डिलिव्हरी 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :