KTM ने लॉन्च केल्या दोन स्पेशल एडिशन बाईक, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
KTM Bike: भारतीय बाजारपेठेत लॉन्च केल्या आहेत. याची KTM RC रेंजसह विक्री केली जाणार आहे. कंपनीने स्पेशल एडिशन लॉन्च करूनही याची कंपनीत कोणतीही वाढ केलेली नाही.
KTM Bike: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी केटीएमने भारतात आपल्या दोन नवीन स्पेशल एडिशन बाईक लॉन्च केल्या आहेत. या बाईक आहेत RC390 आणि RC200. याची KTM RC रेंजसह विक्री केली जाणार आहे. कंपनीने स्पेशल एडिशन लॉन्च करूनही याची किंमत जुन्या मॉडेलच्या जवळपासच ठेवली आहे. कंपनीने KTM RC390 GP ची किंमत 3,16,070 रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. तर RC 200 GP ची किंमत 2,14,688 रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. रुपयांना खरेदी करता येईल.
केटीएमच्या या दोन्ही बाईक MotoGP रेसिंग बाईकपासून प्रेरित आहेत. नवीन एडिशनला नारिंगी बेस पेंटसह विशिष्ट डिकल्स मिळतात. जे फेअरिंग आणि फ्रंट फेंडरवर दिसतात. कंपनीने याच्या मेकॅनिकल कॉन्फिगरेशनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. RC390 आणि RC200 च्या स्पेशल एडिशनसाठी कंपनीने देशभरात बुकिंग सुरू केली आहे. या नवीन बाईकची डिलिव्हरी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
KTM RC390
KTM RC390 मध्ये कंपनीने 373 cc लिक्विड-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 42.41 Bhp ची पॉवर जनरेट करते. तसेच हे इंजिन 37 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तर KTM RC 200 मध्ये 199 cc लिक्विड-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 25.05 bhp पॉवर आणि 19.5 Nm टॉर्क जनरेट करते. दोन्ही बाईकचे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहेत.
डिझाइनच्या बाबतीत RC390 ला समोरील बाजूस LED हेडलाइट, टर्न इंडिकेटर आणि DRLs सह सर्व-एलईडी सेट-अप मिळतो. याला विंडशील्ड देखील मिळते. जे वाऱ्यापासून संरक्षण देते आणि बाईकला गती प्राप्त करण्यास मदत करते. बाईकचे व्हिज्युअल आकर्षण वाढवण्यासाठी स्पोर्टी बॉडी पॅनल्सचा वापर करण्यात आला आहे. या बाईकमध्ये कंपनीने ब्लूटूथ सक्षम TFT इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले दिला आहे, जो म्युसिक कंट्रोल , कॉल /एसएमएस अलर्ट आणि टर्न नेव्हिगेशन सारख्या फीचर्ससह सुसज्ज आहे. यात KTM च्या सुपरमोटो ABS मोड, कॉर्नरिंग ABS, क्विक-शिफ्टरसह कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टमसह अनेक फीचर्स मिळतात.
KTM RC 200
KTM RC 200 ला पूर्णपणे अड्जस्ट हँडलबार मिळतो. तसेच यात एलसीडी डिस्प्ले, एलईडी हेडलाइट देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये सुपरमोटो मोडसह ABS आहे. यात 13.7 लीटरची इंधन टाकी आहे. याच्या मागील बाजूस अॅल्युमिनियम कास्ट आणि स्प्लिट पिलियन ग्रॅब देण्यात आला आहे. याला सस्पेंशनसाठी पुढील बाजूस 43mm USD फोर्क्स आणि मोनोशॉक युनिट आणि मागील बाजूस ब्रेस्ड अलॉय स्विंगआर्म मिळतो. ब्रेकिंगसाठी यात BYBRE कॅलिपरसह समोर 320 मिमी आणि मागील बाजूस 230 मिमी डिस्क ब्रेक मिळतात. नवीन आरसी सीरिजमध्ये ओपन हब आणि कमी स्पोकसह नवीन डिझाइन केलेल्या अलॉय व्हील्स बसवण्यात आल्या आहेत.