kawasaki w175 आहे आपल्या सेगमेंटमधील भारतातील सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Kawasaki W175: दुचाकी निरामय कंपनी कावासाकीची नवीन बाईक W175 अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. या बाईकची डिलिव्हरी या वर्षी डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतातील ही कंपनीची सर्वात स्वस्त बाईक आहे.
Kawasaki W175: दुचाकी निरामय कंपनी कावासाकीची (Kawasaki) नवीन बाईक W175 अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. या बाईकची डिलिव्हरी या वर्षी डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारतातील ही कंपनीची सर्वात स्वस्त बाईक आहे. याची किंमत भारतीय बाजारपेठेत 1,47,000 रुपयांपासून सुरू होणार आहे. याचे स्पेशल एडिशन मॉडेल याच्या बेस मॉडेलपेक्षा थोडे महाग असून याची किंमत 1.49 लाख रुपये आहे. ही एक रेट्रो थीम असलेली बाईक आहे. जी रॉयल एनफिल्ड हंटर 350 आणि TVS रोनिनसह इतर बाईकशी स्पर्धा करेल. या बाईकमध्ये 177cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 12.8bhp पॉवर आणि 13.2Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या बाईकचे सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे याच्या भारत स्पेक व्हर्जनमध्ये देण्यात आलेले इंजिन हे कार्ब्युरेट नसून इंधन-इंजेक्टेड आहे.
डिझाइन
या नवीन बाईकची डिझाइन जुन्या काळातील क्लासिक डिझाइनसह येणार्या बाईक्ससारखीच आहे. ज्याला अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह रेट्रो रोडस्टर देण्यात आला आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये डब्ल्यू ब्रँडिंगसह तांत्रिक फीचर्सऐवजी डिझाइनवर अधिक भर देण्यात आला आहे. यात गोल हेडलॅम्प आणि वायर स्पोक व्हील देखील मिळतात. जे ग्राहकांना पुन्हा त्याच्या क्लासिक रेट्रो डिझाइनची आठवण करून देतात.
फीचर्स
या बाईकमध्ये जास्त फीचर्स देण्यात आलेले नाहीत. पण याच्या हलक्यापणामुळे बाईकची कार्यक्षमता वाढेल. यात खूप पॉवरफुल इंजिन देण्यात आलेले नाही. यात कोणतेही मागील डिस्क ब्रेक किंवा एलईडी लाईट देखील मिळत नाहीत. या बाईकमध्ये उपलब्ध 165 मिमी ग्राउंड क्लीयरन्स भारतीय रस्त्यांसाठी योग्य आहे. ही कंपनीची भारतातील दुसरी डब्ल्यू सीरीज बाईक आहे आणि रेट्रो बाईक फीलसह स्मूथ राइडिंग देते.
ही बाईक Ebony आणि लाल अशा दोन रंगात उपलब्ध असेल. तसेच ही बाईक हे दोन प्रकारांमध्ये येईल. ज्यात एक स्टॅंडर्ड आणि दुसरी विशेष व्हर्जन असेल. ज्या सेगमेंटमध्ये ही बाईक येणार आहे. त्यात बाजारात आधीच रॉयल एनफिल्ड, जावा आणि येझदीने आपली चांगली पकड निर्माण केली आहे. ही बाईक अनेक आंतरराष्ट्रीय बाजारातही विकली जाते.
महत्त्वाच्या इतर बातम्या