Kawasaki Eliminator Cruiser बाईक जपानमध्ये लॉन्च, भारतातही लवकरच होणार सादर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
New Kawasaki Bike: Kawasaki ने आपली 2023 एलिमिनेटर क्रूझर बाईक जपानी बाजारात लॉन्च केली आहे. स्टँडर्ड आणि एसई अशा दोन ट्रिममध्ये ही बाईक आणण्यात आली आहे.
New Kawasaki Bike: Kawasaki ने आपली 2023 एलिमिनेटर क्रूझर बाईक जपानी बाजारात लॉन्च केली आहे. स्टँडर्ड आणि एसई अशा दोन ट्रिममध्ये ही बाईक आणण्यात आली आहे. ही बाईक भारतीय बाजारपेठेतही दाखल होण्याची शक्यता आहे. ही बाईक Honda Rebel 300 शी स्पर्धा करेल. या बाईकमध्ये कंपनीने अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. ही बाईक दिसायलाही स्टायलिश आहे. या बाईकमध्ये कंपनीने काय दिलं आहे खास आहे आणि ही भारतात कधी होणार लॉन्च याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
New Kawasaki Bike: कशी आहे डिझाइन?
कावासाकी एलिमिनेटर क्रूझर बाईकच्या नवीन व्हर्जनमध्ये रेट्रो स्टाइल कायम ठेवण्यात आली आहे. यात गोल आकाराचा एलईडी हेडलाइट, एक प्रचंड गोल इंधन टाकी, ड्युअल पीस सीट सेटअप आणि अर्धवट उघडलेल्या फ्रेमसह क्रूझर स्टॅन्स मिळतात. त्यामध्ये कोणतेही क्रोम वर्क दिलेले नाही, जे आधीच्या एलिमिनेटरमध्ये आढळले होते. संपूर्ण बॉडीवर्क आणि पार्ट्सला ब्लॅक फिनिश देण्यात आली आहे. नवीन एलिमिनेटरमध्ये फ्रंट आणि रियर कॅमेरे देण्यात आले आहेत, जे डॅश-कॅम्सप्रमाणे वापरले जातात. यात एक लहान बायकिंग फेअरिंग देखील मिळते.
New Kawasaki Bike: इंजिन
नवीन कावासाकी एलिमिनेटर 398cc समांतर-ट्विन इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले 47bhp आणि 37Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर यांसारखी महत्त्वाची फीचर्स देण्यात आली आहेत. याला टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल रीअर शॉक ऍब्जॉर्बर्स आणि समोर 310mm डिस्क आणि ड्युअल-चॅनल ABS सह मागील बाजूस 240mm डिस्क ब्रेक मिळतात.
या बाईकच्या पुढील बाजूस 18 इंच आणि 16 इंच रियर अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. मोटरसायकलचे वजन 176 किलो आहे आणि 12-लिटरची इंधन टाकी आहे, सीटची उंची 735 मिमी आहे.
New Kawasaki Bike: किंमत किती?
नवीन कावासाकी एलिमिनेटर क्रूझरची प्रारंभिक किंमत जपानमध्ये 7,59,000 येन (सुमारे 4.71 लाख भारतीय रुपये) ठेवण्यात आली आहे. याच्या टॉप-स्पेक SE व्हेरियंटची किंमत 8,58,000 येन (सुमारे 5.33 लाख रुपये) आहे. येत्या काही महिन्यात ही बाईक भारतीय बाजारात येण्याचीही शक्यता आहे.
New Kawasaki Bike: कोणाशी होणार स्पर्धा?
नवीन कावासाकी एलिमिनेटर बाईकची स्पर्धा Honda Rebel 300 शी होईल, जी 286cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे. या बाईकची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 2.30 लाख रुपये आहे.