kia Sonet आणि Audi Q7; तारक मेहता का उल्टा चश्माच्या जेठालालकडे आहे आलिशान गाड्यांचं कलेक्शन, पाहा संपूर्ण लिस्ट
Taarak Mehta Ka Ulta Chashma: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. गेल्या 14 वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
Taarak Mehta Ka Ulta Chashma: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. गेल्या 14 वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी सुरुवातीपासूनच त्याचा एक भाग आहे आणि त्याची व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र तुम्हाला त्याच्या महागड्या कार कलेक्शनबद्दल माहित आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला दिलीप जोशी यांच्या आलिशान गाड्यांच्या कलेक्शनबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ जेठालालकडे कोण कोणत्या महागड्या गाड्या आहेत...
kia Sonet
दिलीप जोशी याच्याकडे काळ्या रंगाची SUV Kia Sonet आहे. ज्याची किंमत 7.99 लाख रुपये ते 13.99 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. अनेक स्मार्ट फीचर्सने सुसज्ज, यात तुम्हाला टायर मॉनिटरिंग सिस्टीम पाहायला मिळते. ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायसह येते. डिझेलमध्ये 1.5 CRDi इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये येतो. यात 26.03 सेमी टचस्क्रीन आहे. सेफ्टीसाठी यात 4 एअरबॅग आहेत. मनोरंजनासाठी बोसच्या 7 प्रिमियम साउंड सिस्टीम उपलब्ध आहेत.
Audi Q7
दिलीप जोशी याच्या कार कलेक्शनमधील ही सर्वात महागडी कार आहे. भारतात या 7-सीटर SUV कारची किंमत 83.32 लाख ते 88.98 लाख रुपये आहे. या कारमध्ये 3.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 340 PS पॉवर आणि 500 Nm टॉर्क जनरते करते. इंजिनसोबतच यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही एक ऑल-व्हील-ड्राइव्ह कार आहे. यात पॅनोरामिक सनरूफ, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी) सारखी फीचर्स आहेत. सेफ्टीसाठी SUV ला लेन डिपार्चर वॉर्निंग, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स, पार्क असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सारखी फीचर्स देण्यात आले आहेत.
Toyota Innova Crysta
दिलीप जोशी याच्याकडे 7-सीटर एमपीव्ही (मल्टी-युटिलिटी व्हेईकल) टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार आहे. या कारची किंमत 18.09 ते 23.83 लाख रुपये आहे. टोयोटा कार G, G+, GX, VX आणि ZX या पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही एमपीव्ही कार 7 सीटर आणि 8 सीटर दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. टोयोटाची इनोव्हा क्रिस्टा 2.7-लीटर पेट्रोल इंजिनसह येते. जी 166 पीएस पॉवर आणि 245 Nm टॉर्क जनरेट करते. नुकतेच बंद केलेले डिझेल प्रकार 2.4-लिटर इंजिनद्वारे समर्थित होते. जे 150 PS पॉवर आणि 360 Nm टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्सेसच्या पर्यायसह येते.