Jeep Electric SUV : जीप कंपनीही इलेक्ट्रिक विश्वात, लवकरच दमदार इलेक्ट्रिक एसयूव्ही घेऊन बाजारात उतरणार
Jeep Electric SUV : प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी जीप देखील आता इलेक्ट्रीक कार्स तयार करणार असून टाटा नेक्सॉन, एमजी झेडएस अशा कार्सना टक्कर देण्यासाठी जीप सज्ज झाली आहे.
Jeep Electric SUV : एकीकडे वाढतं प्रदूषण आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव यांच्यामुळे आता भविष्यात इलेक्ट्रीक कार्स (Electric Cars) अधिक प्रमाणात वापरल्या जाणार यात शंका नाही. त्यामुळे सर्व कंपन्या आपआपल्या इलेक्ट्रीक कार्स बाजारात आणत आहेत. सध्यातरी टाटा (Tata) , एमजी (MG) अशा काही कंपन्यांच्या इलेक्ट्रीक कार्स बाजारात असून इतरही कंपन्या हळूहळू इलेक्ट्रीक कार्स लॉन्च करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. यातच प्रसिद्ध कार कंपनी जीप आपली आगामी इलेक्ट्रीक एसयूव्ही (Jeep Electric SUV) बाजारात आणणार आहे.
इतर इलेक्ट्रीक कार्सच्या तुलनेत काहीशी कॉम्पॅक्ट असणाऱ्या या एसयुव्ही भारतीय बाजारात लॉन्च होण्यासाठी सध्यातरी अवधी आहे. 2023 पर्यंत ही कार लॉन्च होऊन भारतीय बाजारात 2024 पर्यंत येण्याची शक्यता आहे. दरम्यान या गाडीचं नेमकं नाव अद्यापतरी कंपनीने स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे या गाडीची किंमत देखील अजून स्पष्ट झालेली नाही. दरम्यान ही कार टाटाची नेक्सॉन तसंच एमजीची ZS या कार्सना टक्कर देणार असंही म्हटलं जात आहे.
डिझाईन कशी?
इतर जीपच्या कार्सप्रमाणेच लूक असणाऱ्या या एसयुव्हीचं डिझाईन अगदी कॉम्पॅक्ट आहे. समोरचा भाग अधिक कॉम्पॅक्ट असून या आपण डिझाइनमध्ये जीप कंपनीची कंपास कारचा लूक पाहू शकतो. या कारची चाकं अगदी मोठी असून 4X4 ऑप्शनमध्येही ही कार उपलब्ध होऊ शकते. तसेच या कारचे टेल-लॅम्प देखील अगदी आकर्षक आहेत. या कारची आसनक्षमता सात असल्याची माहितीही कंपनीकडून दिली जात आहे.
हे देखील वाचा-
- New Everest/Endeavour: फोर्ड इंपोर्टेड नवीन एव्हरेस्ट-एन्डेव्हर येतेय, मिळणार 'हे' जबरदस्त फीचर्स
- Cheapest SUV In India : मोठ्या कुटुंबासाठी भारदस्त कार, देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर SUV
- E Vehicle : इलेक्ट्रिक वाहने प्रदूषण कमी करणार; #ShoonyaKaSafar नेमकं काय आहे?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha