(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Car Tips : तुम्हीही तुमची कार अनेक दिवस चालवत नसाल, तर आजच चालवायला लागा, नाहीतर कार खराब झालीच म्हणून समजा!
फार दिवस कार न चालवल्याने कार बिघडू शकते किंवा कामच्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. कार न चालवल्याने नेमकं काय होऊ शकतं आणि ते तुम्हाला कसं महागात पडू शकतं? हे समजून घ्या नाही तर अधिक पैसे खर्च होतील.
Car Tips : सध्या सगळीकडे वाहतूक (Car Tips) कोंडी वाढत आहे. त्यात सगळे (Auto News) आपली कार काढून बाहेर जाण्याचा कंटाळा करतात. महागडी कार मग दारासमोर तशीत उभी राहते किंवा काही जण तर पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त असल्याने अनेकदा लोक कार कमी चालवणे पसंत करतात. पण असे केल्याने कारमध्ये ही अनेक समस्या निर्माण होतात. जागेवरच कार उभी राहिल्याने किंवा फार दिवस कार न चालवल्याने कार बिघडू शकते किंवा कामच्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. कार न चालवल्याने नेमकं काय होऊ शकतं आणि ते तुम्हाला कसं महागात पडू शकतं? हे समजून घ्या नाही तर अधिक पैसे खर्च होतील.
जंगाचा धोका असतो
जर काराला बरेच दिव, एका ठिकाणी उभे ठेवले जाते तर त्याच्यावर जंग लागण्याचा धोका वाढतो. आजूबाजुचं वातावरण, ऊन, वारा, पाऊस त्यात धूळ एकत्र जमते आणि लोखंड जंगायला सुरुवात होते. महागड्या गाड्यांचा रंगदेखील उडण्याची शक्यता असते. धुळीमुळे आणि फार दिवस जागेवर उभी राहिल्याने टायरच्या डिस्कदेखील खराब होऊ शकतात.
ब्रेक नुकसान
पार्क केलेल्या गाडीला हँडब्रेक लावल्यानेही गाडीचे नुकसान होते. कार बराच वेळ उभी असताना हँडब्रेक चालू ठेवल्यास ब्रेक शू धातूला चिकटतो. असे झाल्यावर ब्रेक शूज खराब होतात आणि मेकॅनिककडे गेल्यावरच गाडी दुरुस्त होते.
टायरचे लाईफ कमी होते
गाडी जास्त वेळ वापरली नाही तर गाडीच्या टायरवरही विपरीत परिणाम होतो. गाडी एका जागी जास्त वेळ उभी ठेवल्याने गाडीच्या टायरच्या काही भागांवर जास्त दबाव येतो. याशिवाय गाडीच्या टायरमध्ये असलेली हवाही हळूहळू कमी होऊ लागते. एका ठिकाणी कमी हवा आणि दाबामुळे टायर कोरडे होऊ लागतात. जेव्हा असे होते तेव्हा टायर लवकर खराब होतात.
बॅटरीवर वाईट परिणाम होतो
कार बराच वेळ उभी राहिल्यास बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. असे घडते कारण कार चालू असताना बॅटरी चार्ज होत राहते. पण कार बंद राहिल्यास बॅटरीमधील करंट हळूहळू कमी होऊ लागतो. असे वारंवार घडल्यास बॅटरी लवकर खराब होऊ शकते.
इतर महत्वाची बातमी-
Kia EV9 electric SUV Launch : Kia EV9 electric SUV टेस्टिंग सुरू, लवकरच लाँच होण्याची शक्यता