Hop Electric e-scooter LEO launch: GPS ट्रॅकर, 4 राइडिंग मोड आणि 1Km खर्च फक्त 20 पैसे; हॉप लिओ हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च
Hop Electric e-scooter LEO launch: इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप हॉप इलेक्ट्रिकने लिओ इलेक्ट्रिक (HOP Electric) स्कूटरचा नवीन हाय-स्पीड प्रकार लॉन्च केला आहे. कंपनीचा दावा आहे की, या हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरला 1 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी फक्त 20 पैसे मोजावे लागतील.
Hop Electric e-scooter LEO launch: 2.5 तासात होत चार्ज, मिळणार 125Km ची रेंज
हॉप लिओ इलेक्ट्रिक स्कूटर 2.2 kW BLDC हब इलेक्ट्रिक मोटरद्वारे धावते. जी 90 Nm पीक टॉर्क आउटपुट तयार करते. ही मोटर सुलभ हॅण्डलिंग आणि सुरळीत रायडिंगसाठी जबरदस्त आहे. यात 2.1 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, 850W चा स्मार्ट चार्जर वापरून 2.5 तासात बॅटरी 0-80 टक्के चार्ज होऊ शकते. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 125 किलोमीटरची रेंज देऊ शकते.
Hop Electric e-scooter LEO launch: जीपीएस ट्रॅकरसह एलसीडी कन्सोल
Hop Leo हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरला 160mm ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. त्यामुळे खडबडीत रस्त्यावरून सहज वाहन चालवता येते. याची लोडिंग क्षमता 160 किमी आहे. यात थर्ड पार्टी जीपीएस ट्रॅकरसह एलसीडी डिजिटल कन्सोल देखील मिळतो. स्कूटर ब्लॅक, व्हाइट, ग्रे, ब्लू आणि रेड या 5 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हॉप लिओला चार राइडिंग मोड मिळतात, ज्यात इको, पॉवर, स्पोर्ट आणि रिव्हर्स समाविष्ट आहेत. याला समोर आणि मागील दोन्ही बाजूस डिस्क ब्रेकसह 90/90/R10 व्हील्स मिळतात. हे मॉडेल कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टम आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसह येते. म्हणजेच कंपनीने त्यात सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेतली आहे. कंपनी या स्कूटरवर 3 वर्षांची वॉरंटी देत आहे. भारतीय बाजारपेठेत ते Ola S1, बजाज चेतक, TVS iQube सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.
इतर बातम्या: