एक्स्प्लोर

New Honda Activa Launched: लाडकी Activa आली; एच-स्मार्ट तंत्रज्ञानाने आहे सुसज्ज; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

New Honda Activa Launched: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी होंडाने Activa चे H-Smart व्हेरिएंट लॉन्च केले आहे. कंपनीने या स्कूटरची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 74,536 रुपये ठेवली आहे.

New Honda Activa Launched: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी होंडाची Activa स्कूटर ही देशात खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. विशेष करून तरुणाईची या स्कूटरला मोठी पसंती आहे. यामुळेच बाजारात या स्कूटरला मोठी मागणी असून ही देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक आहे. अशातच आता कंपनीने Activa चे H-Smart व्हेरिएंट लॉन्च केले आहे. कंपनीने या स्कूटरची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 74,536 रुपये ठेवली आहे. ही स्कूटर एच-स्मार्ट तंत्रज्ञानासह कंपनीच्या सध्याच्या Activa 6G चे अपडेटेड मॉडेल आहे.   

Activa H Smart Price: किती आहे किंमत? 

होंडाच्या मते, नवीन अ‍ॅक्टिव्हा एच-स्मार्ट तीन ट्रिममध्ये आणण्यात आली आहे. ज्यामध्ये स्टँडर्ड, डिलक्स आणि स्मार्ट यांचा समावेश आहे. त्यांच्या एक्स-शोरूम किंमती अनुक्रमे 74,536, ₹77,036 आणि 80,537 रुपये आहे. 

New Honda Activa Launched: काय आहे नवीन?

कंपनीचा दावा आहे की या स्कूटरमध्ये स्मार्ट फाईंड फीचर देण्यात आले आहे. जेणेकरुन जेव्हा ग्राहक स्मार्ट की वापरून स्कूटरला गर्दीत शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा स्कूटर अलार्म वाजतो आणि प्रतिसाद मिळतो. या फीचरच्या मदतीने रायडर फिजिकल चावीशिवायही स्कूटर लॉक आणि अनलॉक करू शकतो. हे फीचर स्मार्ट कीद्वारे स्कूटरपासून दोन मीटरच्या अंतरात शोधले जाऊ शकते. यासोबतच नवीन अ‍ॅक्टिव्हा एच-स्मार्टमध्ये इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विचही देण्यात आला आहे.

Activa H Smart Features: मिळणार 'हे' नवीन फीचर्स 

नवीन Honda Activa H-Smart मध्ये 12-इंच फ्रंट अलॉय व्हील, मोठा व्हीलबेस, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, लांब फूटबोर्ड एरिया, नवीन पासिंग स्विच, अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन आणि DC LED हेडलॅम्प्स मिळतात. यामुळे ही स्कूटर रायडकरताना आरामदायी अनुभव येतो.

Activa H Smart: या नवीन तंत्रांचा करण्यात आला आहे वापर 

कंपनीने Activa H-Smart मध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान वापरले आहे. यात 110cc PGM-FI इंजिन देण्यात आले आहे. OBD2 सह या इंजिनमध्ये एन्हांस्ड स्मार्ट पॉवर (eSP) तंत्रज्ञान देखील जोडण्यात आले आहे. यासोबतच अपडेटेड प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन, नवीन स्मार्ट टम्बल टेक्नॉलॉजी, एसीजी स्टार्टर आणि फ्रिक्शन रिडक्शन टेक्नॉलॉजी यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. पॉवरट्रेन अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी या पेटंट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

TVS ज्युपिटरशी स्पर्धा करणार?

भारतात TVS Jupiter ची एक्स-शोरूम किंमत 73,488 रुपये आहे. ही 6 प्रकार आणि 16 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 109.7cc BS6 इंजिन आहे. जे 7.77 bhp पॉवर आणि 8.8 Nm टॉर्क जनरेट करते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शनSambhaji Bhide vs Vidya Lolge : संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये -विद्या लोलगेNagpur Deekshabhoomi Parking Project : वादात नूतणीकरण; विरोधाचं कारण Special ReportAmbadas Danve vs Prasad Lad : हातवारे,  शिवीगाळ, राजकीय संस्कृती गाळात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात  प्रवासी संख्येत दुपटीने  वाढ
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात प्रवासी संख्येत दुपटीने वाढ
Medha Patkar : 25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Embed widget