Vida Electric Scooter: एक मिनिटाच्या चार्जवर 1.2 किमी धावते, हिरोची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आली
Vida Electric Scooter Price In India: Hero MotoCorp ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Hero Vida भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने ही स्कूटर V1 Pro आणि V1 Plus या दोन प्रकारात लॉन्च केली आहे.
Vida Electric Scooter Price In India: भारतात इलेक्ट्रिक वाहनाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. हेच पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपले इलेक्ट्रिक वाहन बाजारात लॉन्च करत आहेत. यातच आता कारसोबतच इलेक्ट्रिक स्कूटरमध्येही मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. सध्या ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. यातच जुन्या वाहन उत्पादक कंपन्या टीव्हीएस, बजाज आणि हिरोही आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन बाजारात उतरले आहे. यातच आता आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Hero Vida भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने ही स्कूटर V1 Pro आणि V1 Plus या दोन प्रकारात लॉन्च केली आहे. कंपनीने Vida V1 Pro ची किंमत 1.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि V1 Plus ची किंमत 1.45 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. कंपनीने दोन्ही स्कूटर पोर्टेबल बॅटरीसह लॉन्च केल्या आहेत. म्हणजेच ग्राहकांना या स्कूटरमधून बॅटरी बाहेर काढून चार्ज करता येते.
रेंज
आपल्या या नवीन स्कूटरमध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एकदा पूर्ण चार्ज केल्यावर Vida V1 Pro 165 किलोमीटरची रेंज देते, तर Vida V1 Plus 143 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. कंपनी दोन्ही स्कूटरसोबत फास्ट चार्जिंगचा पर्यायही दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, दोन्ही स्कूटर फास्ट चार्जरने चार्ज करून फक्त एका मिनिटाच्या चार्जवर 1.2 किलोमीटरपर्यंत धावू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरो आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्यासाठी चार्जिंग नेटवर्क देखील तयार करत आहे. जे Vida इकोसिस्टमचा एक भाग असेल. विडा इकोसिस्टममध्ये कंपनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांसाठी खास डिझाइन केलेले चार्जिंग नेटवर्क, सर्व्हिस प्लॅटफॉर्म तयार करत आहे. दरम्यान, या दोन्ही स्कूटरचा टॉप स्पीड 80 किमी/तास आहे. Vida V1 Pro ला 0 ते 40 किमी/ताशी वेग पकडण्यासाठी 3.2 सेकंद लागतात, तर V1 प्लसला 3.4 सेकंद लागतात.
फीचर्स
विडा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहेत. कंपनी दोन्ही स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कीलेस कंट्रोल, रिव्हर्स मोड, तीन राइड मोड (इको, राइड स्पोर्ट आणि कस्टम), स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, सेफ्टी अलार्म, क्रूझ कंट्रोल आणि इतर अनेक फीचर्ससह एक मोठा 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Tiago EV Review: Tata Tiago EV फर्स्ट लूक रिव्ह्यू, जाणून घ्या कशी आहे ही कार
Tata Tiago EV vs Tigor EV: टाटा टियागो आणि टाटा टिगोर या दोन इलेक्ट्रिक कारमध्ये कोणती आहे बेस्ट? जाणून घ्या