एक्स्प्लोर

Adventure Bikes: 'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त अ‍ॅडव्हेंचर बाईक, पाहा संपूर्ण लिस्ट

Affordable Adventure Bikes: भारतात अॅडव्हेंचर बाईक खूप पसंत केल्या जातात. मात्र या बाईकच्या किंमती अधिक असल्याने अनेक जणांना या बाईक खरेदी करणं परवडत नाही.

Affordable Adventure Bikes: भारतात अॅडव्हेंचर बाईक खूप पसंत केल्या जातात. मात्र या बाईकच्या किंमती अधिक असल्याने अनेक जणांना या बाईक खरेदी करणं परवडत नाही. अलीकडच्या काळात अनेक कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये त्यांचे नवीन मॉडेल लॉन्च केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अॅडव्हेंचर टूरिंग बाईक्स लोक आराम आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विकत घेतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही लोकप्रिय अॅडव्हेंचर बाईकबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमतही खूप कमी आहे.

Hero XPulse 200 4V

Xpulse 200 4V बाईकला 199.6 cc, इंधन-इंजेक्‍ट, एअर आणि ऑइल-कूल्ड इंजिन मिळते. जे 8,500 rpm वर 18.04 PS पॉवर आणि 6,500 rpm वर 16.45 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. यात समोर 37 मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स, प्रीलोड अॅडजस्टेबल रीअर मोनोशॉक सस्पेंशन आणि सिंगल-चॅनल ABS सह पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक मिळतात. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.38 लाख रुपये आहे.

होंडा CB 200X

Honda CB200X ही अॅडव्हेंचर टूरिंग व्हर्जनमध्ये हॉर्नेट 2.0 नेकेड म्हणून बाजारात आणली गेली आहे. या बाईकमध्ये 184.4 cc सिंगल-सिलेंडर इंजिन वापरण्यात आले आहे. जे 8500 rpm वर 17 PS चा पॉवर आणि 6000 rpm वर 16.1 Nm टॉर्क जनरेट करू शकते. याला मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशनसह समोर USD फोर्क्स मिळतात. यासोबतच ऑल-एलईडी लाइटिंग, नकल गार्ड, स्प्लिट-सीट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अंडर-कॉल आणि व्हिझर देखील उपलब्ध आहेत. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.49 लाख रुपये आहे.

Suzuki V-Strom SX : सुझुकी व्ही-स्ट्रॉम एसएक्स

सुझुकीच्या Gixxer 250 प्लॅटफॉर्मवर आधारित, V-Strom SX ला 249cc, ऑइल-कूल्ड इंजिन मिळते. जे 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले 26.5 PS पॉवर आणि 22.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात समोर टेलीस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस 7-स्टेप प्रीलोड अ‍ॅडजस्टॅबिलिटीसह मोनोशॉक सस्पेंशन आहे. ABS सह दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.12 लाख रुपये आहे.

इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 

Cheapest Mahindra Thar : सर्वात स्वस्त Mahindra Thar भारतात लॉन्च, जाणून घ्या किती आहे किंमत आणि फीचर्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीयABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 4 November 2024 : ABP MajhaRaj Thackeray Kalyan Speech : शिवसेना-धनुष्यबाण बाळासाहेबांचं ; पहिल्याच सभेत ठाकरे,शिंदेंवर हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget