Cheapest Mahindra Thar : सर्वात स्वस्त Mahindra Thar भारतात लॉन्च, जाणून घ्या किती आहे किंमत आणि फीचर्स
Mahindra Thar 2WD launched in India: महिंद्रा अँड महिंद्राने आपली बहुप्रतीक्षित एसयूव्ही Mahindra Thar 2WD अखेर भारतात लॉन्च केली आहे. ही महिंद्राची सर्वात परवडणारी एसयूव्ही आहे.
Mahindra Thar 2WD launched in India: फीचर्स
Mahindra Thar 2wd Price in India 2023 : किंमत
नवीन थार दोन नवीन रंग पर्यायांमध्ये (ब्लॅझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाइट) सादर केली गेली आहे. यात 1.5 L डिझेल आणि 2.0 L टर्बो पेट्रोल असे दोन इंजिन पर्याय आहेत. याचा डिझेल व्हेरिएंटची किंमत 9.99 लाख रुपये आणि टर्बो पेट्रोलची किंमत 13.49 लाख रुपये आहे. नवीन थार AX (O) आणि LX ट्रिममध्ये उपलब्ध आहे.
Mahindra Thar 2WD launched in India: इंजिन
महिंद्रा 2WD व्हेरिएंटमध्ये 1.5-L डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे XUV300 मध्येही आहे. हे इंजिन 117hp पॉवर आणि 300Nm चा पीक टॉर्क देते. जे 6-स्पीड मॅन्युअल (MT) गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. तसेच याचे दुसरे इंजिन 2.0-L टर्बो पेट्रोल 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह सादर केले गेले आहे. हे इंजिन 152hp पॉवरसह 320Nm टॉर्क देते.
मारुती जिम्नीशी होणार स्पर्धा
महिंद्राची ही कार मारुतीच्या आगामी ऑफ रोड कार मारुती जिम्नीशी स्पर्धा करेल. तसेच ही कार अशा लोकांसाठी देखील चांगली सिद्ध होईल. ज्यांना महिंद्रा थार घ्यायची आहे. परंतु 4X4 पर्यायासह नाही. तसेच किमतीतील फरकामुळे अशा लोकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.