होंडा आणि जनरल मोटर्स लॉन्च करणार स्वस्त 'इलेक्ट्रिक कार', जाणून घ्या कधी
Electric Cars: जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच सध्या जवळपास सर्वच कार निर्माते इलेक्ट्रिक कार बनवण्यावर भर देत आहेत.
Electric Cars: जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच सध्या जवळपास सर्वच कार निर्माते इलेक्ट्रिक कार बनवण्यावर भर देत आहेत. यासोबतच कंपन्या आपापसात भागीदारी करत आहेत, जेणेकरून एकमेकांशी तंत्रज्ञान शेअर करून इलेक्ट्रिक कार एकत्र बनवता येतील. असं असलं तरी सध्या इलेक्ट्रिक कारची किंमत पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत महागड्या किमतीमुळे अनेकांना इलेक्ट्रिक कार घेणे शक्य होत नाही.
हीच बाब लक्षात घेत परवडणाऱ्या किमतीत इलेक्ट्रिक कार तयार करण्याचे आव्हान कार निर्मात्यांसमोर आहे. यासाठी जनरल मोटर्स आणि होंडा काही स्वस्त इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी एकत्र काम करण्याचा विचार करत आहेत. जनरल मोटर्स आणि होंडा पुढच्या पिढीतील अल्टिअम बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त इलेक्ट्रिक कार तयार करण्याचा विचार करत आहे. या कार्समध्ये कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हरचाही समावेश असेल. उत्तर अमेरिकेत याची विक्री 2027 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
GM ग्लोबल प्रोडक्ट डेव्हलपमेंट, परचेसिंग आणि सप्लाय चेनचे कार्यकारी उपाध्यक्ष डग पार्क्स म्हणाले की, आमची एक इलेक्ट्रिक वाहन तयार करण्याची योजना आहे, ज्याची किंमत आगामी Chevrolet Equinox EV पेक्षा कमी असेल. दरम्यान, GM आणि Honda ने अनेक वर्षांपासून यशस्वीपणे भागीदारीत काम केलं आहे. 2013 मध्ये कंपन्यांनी पुढील पिढीतील इंधन सेल प्रणाली आणि हायड्रोजन स्टोरेज तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एकत्र काम करण्यास सुरुवात केलं होत.
महत्वाच्या बातम्या :
- नव्या फिचरसह ह्युंदाईची स्वस्तातील क्रेटा कार लॉन्च, जाणून घ्या किंमत
- Next-Gen Ertiga Booking Starts: मारुतीची नवीन Next-Gen Ertiga येतेय, आजपासून बुकिंग सुरू
- ही आहे जगातील पहिली 'सोलर इलेक्ट्रिक कार', एका चार्जमध्ये गाठते 805 किमी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha