Maybach S-Class : रॉयल लूक देणारी मेबॅच एस-क्लास मर्सिडीज नेमकी कशी आहे? 4D साउंड सिस्टमसह जाणून घ्या याचे फीचर्स
Maybach S-Class : मेबॅच एस-क्लासचा भारतातील एस-क्लास ही सर्वात टॉप मर्सिडीज आहे.

Maybach S-Class : मर्सिडीजची मेबॅच एस-क्लास (Maybach S-Class) ही एक लक्झरी आहे. परंतु नवीन मेबॅच व्हर्जन त्यात आणखी लक्झरी आणि टेक्नॉलॉजीची भर घालते. ज्यामुळे ती भारतात आढळणाऱ्या सर्वात आलिशान सेडानपैकी एक आहे. मेबॅच एस-क्लासचा भारतातील एस-क्लास ही सर्वात टॉप मर्सिडीज आहे.
मेबॅच एस-क्लासचे फीचर्स (Maybach S-Class) :
मर्सिडीज-मेबॅच एस-क्लास एस-क्लासच्या हाय व्हेरिएंटपेक्षा 18 सेमी लांब आहे. मेबॅक एस-क्लासला क्रोमड फिन्स आणि पुढच्या बाजूला मर्सिडीज-मेबॅक रेडिएटर ग्रिलद्वारे ओळखले जाऊ शकते. S680 4MATIC ला डिव्हाईनिंग लाईनसह यूनिक टू टोन फिनिश आहे.
बाजूला, तुम्ही फ्लश फिटिंग दरवाजाचे हँडल आणि कारसाठी खास 19-इंचाचे चाक आहेत. या मर्सिडीजची लांबी मागच्या सीटपर्यंत वाढते त्यामुळे अधिकची जागा मिळते. या ठिकाणी बसून तुम्ही आराम करू शकता. विश्रांतीसाठी ही चांगली जागा आहे.
इतर फीचर्स बाबतीत बोलायचे झाले तर, डिजिटल लाईट, मर्सिडीज Mi कनेक्ट, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग लेव्हल दोन फीचर्सचा समावेश आहे. यामध्ये इव्हेसिव्ह स्टीयरिंग असिस्ट आणि क्रॉस-ट्रॅफिक फंक्शनसह सक्रिय ब्रेक असिस्ट यांचा समावेश आहे.
या मर्सिडीजचा डॅशबोर्ड सारखा आहे. पण, डिझाइनसह ती अधिक आकर्षक आहे. तर स्क्रीन मसाज सीट, पॅनोरॅमिक सनरूफ, टॅब्लेटसह मागील मनोरंजन स्क्रीन, अॅडॉप्टिव्ह एअर सस्पेंशन, हवामान नियंत्रणासाठी वेगवेगळे झोन, 13 एअरबॅग्ज यांसारख्या बऱ्याच फीचर्सचा यामध्ये समावेश आहे.
Mercedes-Maybach S-Class दोन इंजिन पर्यायांसह येते. S 580 4MATIC आठ-सिलेंडर इंजिनसह इंटिग्रेटेड सेकंड जनरेशन स्टार्टर-अल्टरनेटर (ISG) आणि 48-व्होल्ट ऑनबोर्ड इलेक्ट्रिकल सिस्टम असे दोन पर्याय या इंजिनमध्ये उपलब्ध आहेत. V12 पेट्रोलसह S680 4MATIC अधिक पॉवरफुल आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतके फीचर्स देणाऱ्या या मर्सिडीजची नेमकी किंमत किती? तर, मेबॅच प्रकाराची मर्सिडीज-मेबॅच एस-क्लास 680 एस-क्लास आणि 'मेड इन इंडिया' असून मेबॅक एस-क्लास 580 4MATIC ची किंमत निश्चितपणे रु.3.20 कोटी आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maruti Baleno : लॉन्च होताच 'या' मारुती कारने घातला धुमाकूळ, ओलांडला 50 हजार बुकिंगचा टप्पा, फीचर्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल
- मारुती आणि ह्युंदाईच्या 'या' जुन्या गाड्या मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत लोक, जाणून घ्या काय आहे कारण
- फक्त 5 मिनिटात इलेक्ट्रिक स्कूटर होणार चार्ज, Ola ने या कंपनीशी केली हातमिळवणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
