(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maruti Baleno : लॉन्च होताच 'या' मारुती कारने घातला धुमाकूळ, ओलांडला 50 हजार बुकिंगचा टप्पा, फीचर्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Maruti Baleno : मारुती सुझुकीच्या बलेनो हॅचबॅकने लॉन्च होताच धुमाकूळ घातला आहे. या कारला दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 50 हजार बुकिंग मिळाले आहेत.
Maruti Baleno : मारुती सुझुकीने अलीकडेच आपल्या बलेनो (Baleno) हॅचबॅकचा फेसलिफ्ट लॉन्च केला. आता लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांतच या कारने बुकिंगचा विक्रम केला आहे. बलेनोच्या बुकिंगने 50,000 चा टप्पा ओलांडला आहे. 7 फेब्रुवारी 2022 रोजी बुकिंग सुरू झाल्यापासून दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत कारने हा टप्पा गाठला आहे. या कारच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की किंमत जाहीर होण्यापूर्वीच तिला 25,000 बुकिंग मिळाले होते. या कारची स्पर्धा Honda Jazz, Tata Altroz आणि Hyundai i20 सारख्या कारशी आहे.
6.35 लाख पासून किंमत सुरु :
2022 पासून सुरू होणारी मारुती सुझुकी बलेनोची किंमत 6.35 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. वाढत्या बुकिंगमुळे, नवीन बलेनो तीन ते चार महिन्यांच्या कालावधी दरम्यान येण्याची शक्यता आहे. नवीन मारुती बलेनोच्या बाहेरील आणि आतील भागात अनेक बदल करण्यात आले आहेत. कारला आता विस्तीर्ण लोखंडी जाळी आणि LED DRL सह रॅपराऊंड टेल लॅम्प मिळतात. यामध्ये नवीन डिझाइनसह 16 इंची अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
सेगमेंटमधील अनेक फीचर्स :
नवीन बलेनोमध्ये अशी अनेक फीचर्स देण्यात आली आहेत जी सेगमेंटमधील इतर कोणत्याही कारमध्ये उपलब्ध नाहीत. मारुतीने पहिल्यांदाच आपल्या कारमध्ये हेड अप डिस्प्ले (HUD) ची सुविधा दिली आहे. या 360-डिग्री कॅमेर्याशिवाय, यात अनेक कनेक्टेड कार फीचर्स देखील देण्यात आली आहेत. यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्टसह 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळते.
22.95kmpl पर्यंत मिळणार मायलेज :
नवीन बलेनोमध्ये फक्त एक पेट्रोल इंजिन 1.2-लिटर 4-सिलेंडर DualJet देण्यात आले आहे. हे इंजिन 89bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT समाविष्ट आहे. AMT गिअरबॉक्ससह 22.95kmpl मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- मारुती आणि ह्युंदाईच्या 'या' जुन्या गाड्या मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत लोक, जाणून घ्या काय आहे कारण
- फक्त 5 मिनिटात इलेक्ट्रिक स्कूटर होणार चार्ज, Ola ने या कंपनीशी केली हातमिळवणी
- Electric Car: देशात सर्वाधिक विक्री होणारी 'ही' इलेक्ट्रिक कार महागली, जाणून घ्या नवीन किंमत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha