
Car Features : कारमधील 'या' फिचर्सना बाजारात जबरदस्त मागणी; तुमचं आवडतं फिचर कोणतं?
Popular Car Feature : 360 डिग्री कॅमेरा हे आजकाल कारमधील सर्वात उपयुक्त आणि ट्रेंडिंग वैशिष्ट्यांपैकी एक आहे.

हेड-अप डिस्प्ले
या फिचर्सची लोकप्रियता 2022 मारुती बलेनोपासून सुरू झाली, त्यानंतर हे फिचर नवीन Brezza आणि Kia Seltos मध्ये मिळू लागले. या फिचर्समध्ये, LED डिस्प्ले युनिट ड्रायव्हरला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवरील सर्व माहिती विंडस्क्रीनवर दिसते. हा डिस्प्ले दोन प्रकारचा आहे, एक जो LED/लेझर वापरतो आणि दुसरा जो शॅडोवर आधारित डिजिटल डिस्प्ले आहे.
पॅनोरामिक सनरूफ
पॅनोरामिक सनरूफ हे आजकाल कारमधील सर्वात लोकप्रिय फिचर्सपैकी एक आहे. पॅनोरामिक सनरूफचा पर्याय अनेक वाहनांमध्ये पर्याय म्हणून दिला जातो. पॅनोरामिक सनरूफ मोठ्या अॅंगलमध्ये उघडला जाऊ शकतो. या फिचर्समुळे तुम्हाला प्रवासादरम्यान आरामदायी अनुभव मिळू शकतो. हे फिचर Hyundai Creta, Tata Harrier, XUV 700, Maruti Grand Vitara यांसह इतर अनेक कारमध्ये उपलब्ध आहे.
हवेशीर जागा
हे फीचर सध्या अनेक वाहनांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. यात एअर सर्क्युलेशन सिस्टीम मिळते. उन्हाळ्याच्या दिवसांत हे फिचर फार उपयोगी ठरतं. Tata Nexon, Tata Harrier, Hyundai Verna, MG Hector यांसह अनेक कारमध्ये हे वैशिष्ट्य असतं.
360 डिग्री कॅमेरा
360 डिग्री कॅमेरा हे आजकाल कारमधील सर्वात उपयुक्त आणि ट्रेंडिंग फिचर्सपैकी एक आहे. त्यामुळे वाहन चालकाला कार किंवा कोणतंही वाहन सुरक्षितपणे पार्क करण्यास मदत होते. सध्या मारुती बलेनो, किया सेल्टोस, एमजी अॅस्ट्रो, ह्युंदाई अल्काझार, निसान किक्स, महिंद्रा XUV700 यांसह अनेक कारमध्ये हे फिचर उपलब्ध आहे.
वायरलेस चार्जिंग
कारमधील वायरलेस चार्जिंग फीचर गेल्या काही काळापासून खूप लोकप्रिय झालं आहे. या सिस्टीममध्ये, स्मार्टफोन किंवा कोणतेही वायरलेस चार्जिंग सपोर्टिंग डिव्हाइस वायरलेस चार्ज करण्यासाठी वाहनामध्ये एक विशेष यंत्रणा आहे. सध्या ही सुविधा Hyundai Grand i10 NISO, Hyundai Venue Maruti Grand Vitara यासह अनेक कारमध्ये उपलब्ध आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
