2025 Kia Carnival HEV : Kia ने सादर केली 2025 कार्निव्हल हायब्रिड, दमदार फिचर्स आणि वैशिष्ट्यांसह 'ही' आहे खासियत
2025 Kia Carnival Hybrid : Kia Motors India ने गेल्या महिन्यात अधिकृतपणे त्यांच्या लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट SUV, Kia Sonet ची फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केले.
2025 Kia Carnival Hybrid : भारतातील सर्वात लोकप्रिय प्रीमियम कार निर्माता कंपनी किआने (Kia Car) अधिकृतपणे 2025 कार्निवल हायब्रिड (2025 Kia Carnival Hybrid) सादर केले आहे. अत्यंत प्रगत टेक्नॉलॉजी आणि चांगल्या कामगिरीचं हे कॉम्बिनेशन आहे. गेल्या वर्षी जागतिक बाजारपेठेत नवीन जनरेशनचा कार्निव्हल यशस्वीपणे लाँच केल्यानंतर, Kia ने आता कार्निवल HEV व्हेरिएंट सादर केलं आहे. एका अहवालानुसार, भारतीय बाजारपेठेत या कारची एन्ट्री होणार की नाही या संदर्भात आता माहिती नाही. पण, Kia लवकरच भारतीय बाजारपेठेत नवीन जनरेशन कार्निव्हल लॉन्च करणार आहे.
इंजिन कसं असेल?
2025 कार्निवल हायब्रिडच्या केंद्रस्थानी एक पॉवरफुल 1.6-लिटर टर्बो-हायब्रीड इंजिन आहे, जे 72 bhp पॉवर आउटपुट तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटरसह एकत्रित होते. इंजिनसह त्याचे एकत्रित पॉवर आउटपुट 242 bhp आणि 367 Nm आहे. विशेषत: इलेक्ट्रिक मोटर मजबूत टॉर्क जनरेट करते. 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेली ही पॉवरट्रेन चांगली कामगिरी तसेच इंधन कार्यक्षमता वाढवते.
नवीन किआची डिझाईन कशी असेल?
नवीन डिझाईन केलेली 17-इंच चाके उत्कृष्ट एअरोडायनॅमिकसह अतिशय आकर्षक आहेत. या व्यतिरिक्त, ड्रायव्हर्स वैयक्तिकृत ड्रायव्हिंग अनुभवासाठी तीन निवडक मोडसह पॅडल शिफ्टर्स वापरून रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम फाईन-ट्यून करू शकतात. ई-हँडलिंग, ई-राइड आणि ई-इव्हेसिव्ह हँडलिंग असिस्ट या वैशिष्ट्यांसह, ते उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव आणि ड्रायव्हिंगवर नियंत्रण ठेवू शकतात.
कारची वैशिष्ट्ये काय असतील?
2025 कार्निवल हायब्रीडमध्ये ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) आणि जंक्शन क्रॉसिंग (FCA-JC), लेन-चेंज ऑनकमिंग (FCA-LO), आणि लेन-चेंज साइड (FCA-LS) तसेच इव्हॅसिव्हसह ऑपरेशन असिस्ट देखील असतील. एक अपडेटेड सूट आहे. नेव्हिगेशन-आधारित स्मार्ट क्रूझ कंट्रोल (N-SCC) आणि इंटेलिजेंट स्पीड लिमिट असिस्ट (ISLA) सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत, जी ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी सुरक्षितता आणि सुविधा वाढवतात.
सोनेट फेसलिफ्ट गेल्या महिन्यात लॉन्च करण्यात आली होती
Kia Motors India ने गेल्या महिन्यात अधिकृतपणे त्यांच्या लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट SUV, Kia Sonet ची फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केली. 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आणि पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज असलेल्या एंट्री-लेव्हल एचटीई व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपये आहे. आता ही कार बाजारात येण्याच्या प्रतीक्षेत ग्राहक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :