Discount on Honda Cars : सेडान कार घ्यायचीय तीसुद्धा Hondaची? आत्ताच संधी आहे, मोठ्या डिस्काऊंट ऑफरचा लाभ घ्या
Discount on Honda Cars : होंडा कंपनी आपल्या कॉम्पॅक्ट सेडान अमेझसाठी अनेक सवलतींसह बोनस सुद्धा ऑफर करतेय.
Discount on Honda Cars : जर तुम्ही होंडा कारचे (Honda Car) चाहते असाल आणि अशीच एक होंडा सेडान कार (Honda Sedan Car) तुम्हाला घरी आणायची असेल तर हा फेब्रुवारी महिना नवीन कार विकत घेण्यासाठी उत्तम आहे. कारण, या महिन्यात होंडाच्या लोकप्रिय सेडान कार Amaze आणि City वर भरघोस सूट देतेय. ही सूट 1.12 लाखांपर्यंत आहे. त्यामुळे आत्ताच तुमची ड्रीम कार विकत घेण्यास सज्ज व्हा.
होंडा अमेझ (Honda Amaze)
सध्या, कंपनी आपल्या कॉम्पॅक्ट सेडान अमेझसाठी अनेक सवलतींसह बोनस सुद्धा ऑफर करतेय. याच्या माध्यमातून ग्राहक साधारण 30 हजारांपर्यंत कॅश डिस्काऊंट बरोबरच 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 20,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि चार हजार रूपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. त्याचबरोबर ग्राहक उपलब्ध असलेल्या लॉयल्टी बोनसचाही लाभ घेऊ शकतात. तर 30,000 रुपयांचा अतिरिक्त फायदा या कारच्या Elite Edition खरेदीवर देखील ग्राहकांना मिळू शकतो.
या कारच्या MY24 व्हेरियंटवर, ग्राहक 20,000 रुपयांपर्यंतची रोख सूट किंवा 24,346 रुपयांपर्यंतच्या मोफत ॲक्सेसरीजमधून निवड करू शकतात. या व्यतिरिक्त, तुम्ही या व्हेरियंटवर 10,000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 23,000 पर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट देखील घेऊ शकता.
होंडा सिटी (Honda City)
Honda ही लोकप्रिय सेडान खरेदी करताना ग्राहकांना तब्बल 1.12 लाख रूपयांपर्यंतचा लाभ घेण्याची ग्राहकांना संधी मिळतेय. होंडा सेडान सिटी कारची निर्मिती 2023 मध्ये करण्यात आली होती. होंडाच्या या सिटी सेडानवर ग्राहकांना 25,000 रुपयांपर्यंतची रोख सवलत किंवा 26,947 रुपयांपर्यंतच्या मोफत ॲक्सेसरीजमधून निवड करण्याची संधी देण्यात आली आहे. याशिवाय 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे.
होंडा (Honda) कंपनी जानेवारी महिन्यात तसेच त्यानंतर ज्या कारची निर्मिती करण्यात आलेली अशा Honda City वर 15,000 पर्यंत रोख सवलत किंवा 16,296 किंमतीची मोफत ॲक्सेसरीज देत आहे. याशिवाय ग्राहक 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील घेऊ शकतात. तर, तुम्ही सुद्धा होंडा कारप्रेमी असाल तर लवकरच या संधीचा लाभ घ्या.
टीप : या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, या वाहनांवर देण्यात येणारी सूट मॉडेल, कारचा कलर आणि व्हेरिएंट यांसारख्या गोष्टींवर देखील अवलंबून असेल. त्यामुळे योग्य माहितीसाठी तुमच्या जवळच्या डीलरशीपशी संपर्क साधा.
महत्त्वाच्या बातम्या :