Audi आता भारतीय ग्राहकांना देणार 5 वर्षांची वॉरंटी, मिळणार हे फायदे
Audi India : जर्मनीतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी ऑडीने भारतात 15 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने कंपनीने आपल्या ग्राहकांना एक खास भेट दिली आहे.
Audi India : जर्मनीतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी ऑडीने भारतात 15 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने कंपनीने आपल्या ग्राहकांना एक खास भेट दिली आहे. कंपनीने भारतातील ग्राहकांसाठी पाच वर्षांपर्यंतचे वॉरंटी कव्हरेज देण्याची घोषणा केली आहे. जे अमर्यादित मायलेजसह असेल. ग्राहकांना लक्षात घेऊन भारतासाठी बनवलेल्या ब्रँडच्या धोरणाचा भाग म्हणून ऑडीने हे पाऊल उचलले आहे. हे वॉरंटी कव्हरेज 1 जून 2022 पासून सुरू होईल.
15 वर्षांचा अप्रतिम प्रवास
लक्झरी ऑटोमेकर ऑडीचे इंडिया चीफ बलबीर सिंग ढिल्लन यांनी सांगितले की, कंपनीने भारतात पंधरा वर्षे पूर्ण केल्याचा विशेष प्रसंग साजरा करण्यासाठी पहिल्यांदाच 5 वर्षांचे वॉरंटी कव्हरेज जाहीर केले आहे. हे कव्हरेज अमर्यादित मायलेजसह देण्यात आले आहे. तसेच हे 1 जून 2022 पासून लागू केले जाईल. हा उपक्रम 'ऑडी इंडिया स्ट्रॅटेजी 2025' च्या अनुषंगाने राबवण्यात येणार आहे. जो संपूर्ण ग्राहकांच्या हिताचा विचार करतो. ते पुढे म्हणाले की, ही घोषणा आम्हाला नेहमीच ग्राहकांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्रेरित करते.
अमर्यादित मायलेजची ऑफर
पाच वर्षांसाठीचे वॉरंटी पॅकेज अमर्यादित मायलेजसह देण्यात येणार असून कारच्या कोणत्याही भागाची दुरुस्ती आणि बदल यांचा यात समावेश आहे. ऑडी ग्रुप हा प्रीमियम आणि लक्झरी सेगमेंटमधील ऑटोमोबाईल्स आणि मोटारसायकलच्या सर्वात यशस्वी उत्पादकांपैकी एक आहे. ऑडी, डुकाटी आणि लॅम्बोर्गिनी या स्वतःच्या ब्रँड्ससह, तसेच 1 जानेवारी 2022 पासून बेंटलेसह, त्यात प्रीमियम ब्रँड समूहासह फॉक्सवॅगन समूहाचा समावेश आहे. हा ब्रँड जगभरातील 100 हून अधिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
TVS Apache RR 310 ला टक्कर द्यायला येत आहे BMW G 310 RR, कंपनीने टीझर केला लॉन्च
Royal Enfield च्या विक्रीत 133 टक्क्यांनी वाढ, Classic 350 आणि Meteor 350 ची वाढली मागणी
Skoda Electric Car : Skoda Enyaq iV या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग सुरु; कंपनीचा दावा 500 किमी पेक्षा जास्त रेंज मिळेल