Ather Electric Scooter: Ather ची 450X इलेक्ट्रिक स्कूटर नवीन रंग पर्यायांसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Ather Energy launches the 450X : इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी Ather Energy ने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर 450 Plus आणि 450X नवीन रंग पर्यायसह लॉन्च केले आहेत.
Ather Energy launches the 450X : इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी Ather Energy ने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर 450 Plus आणि 450X नवीन रंग पर्यायसह लॉन्च केले आहेत. यासोबतच एक मोठी रिडिझाइन केलेली सीटही यामध्ये देण्यात आली आहे. यापूर्वी Ather 450 Duo तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आले होते. ज्यामध्ये ग्रे, मिंट ग्रीन आणि व्हाइट हे रंग पर्याय देण्यात आले होते.
Ather 450X चार नवीन रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये व्हाईट आणि स्पेस ग्रे रंग कायम ठेवण्यात आले आहेत. परंतु आता ट्रू रेड, कॉस्मिक ब्लॅक, सॉल्ट ग्रीन आणि लूनर ग्रे या रंगांच्या पर्यायांचा समावेश करण्यात आला आहे. कॉस्मिक ब्लॅक शेड ही सिरीज 1 च्या मर्यादित व्हर्जनने प्रेरित आहे. तर सॉल्ट ग्रीन पेंट स्कीम आधीपासून उपलब्ध असलेल्या मिंट ग्रीन शेडची जागा घेते. लुनर ग्रे शेड प्रसिद्ध नार्डो रिंग रेस ट्रॅकपासून प्रेरित आहे. आता ही स्कूटर एकूण सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Ather Energy launches the 450X : किती आहे किंमत?
नवीन अपडेट्स दिल्यानंतर कंपनीने या स्कूटरच्या किमतीही वाढवल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी, Ather ने त्याचे अपडेट केलेले 450X Gen 3 मोठ्या बॅटरी पॅकसह, मोठे टायर्स आणि अपडेटेड सॉफ्टवेअरसह सादर केले. 450 Plus ची एक्स-शोरूम किंमत 1.37 लाख रुपये आहे. तर 450X ची किंमत 1.60 लाख रुपयांपासून सुरू होते.
Ather Energy launches the 450X : नवीन सॉफ्टवेअर
AtherStack 5.0 च्या सॉफ्टवेअर अपडेटवर बोलताना, Ather Energy चे सह-संस्थापक आणि CEO तरुण मेहता म्हणाले, “2018 मध्ये जेव्हा आम्ही Ather 450 मध्ये AtherStack सादर केले, तेव्हा ते भारतातील कोणत्याही दुचाकीसाठी पहिले सॉफ्टवेअर इंजिन होते. टचस्क्रीन डॅशबोर्ड, ऑनबोर्ड नेव्हिगेशन आणि रिमोट डायग्नोस्टिक्स. नवीन UI आणि Google Vector Maps सह, AtherStack 5.0 राइडिंगचा अनुभव पूर्णपणे नवीन स्तरावर घेऊन जातो.''
येणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर
यासह या वर्षाच्या अखेरीस, एथर एक लाइट इलेक्ट्रिक स्कूटर देखील बाजारात आणू शकते. ज्यामध्ये कमी फीचर्ससह एक लहान बॅटरी पॅक मिळेल.
Ola S1 Pro शी होणार स्पर्धा
Ola S1 Pro मध्ये बसवलेली इलेक्ट्रिक मोटर 8.5kW ची पॉवर आणि 58Nm टॉर्क जनरेट करते. याची हाय स्पीड 115 किमी प्रतितास आहे आणि याची रेंज 181 किमी प्रतितास आहे. ही स्कूटर संपूर्ण चार्ज होण्यासाठी साडेसहा तास लागतात.