Apple Car: जगभरात होत आहे अॅपल कारची चर्चा, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क चिंतेत
Apple Car Launch Date: जगभरात आपल्या आयफोनसाठी (iphone) प्रसिद्ध असलेली कंपनी अॅपल लवकरच वाहन क्षेत्रात (Automotive industry) एंट्री घेणार आहे. जागतिक बाजारात अॅपलची कार (apple car) येणे जवळपास निश्चित झाले आहे.
Apple Car Launch Date: जगभरात आपल्या आयफोनसाठी (iphone) प्रसिद्ध असलेली कंपनी अॅपल लवकरच वाहन क्षेत्रात (Automotive industry) एंट्री घेणार आहे. जागतिक बाजारात अॅपलची कार (apple car) येणे जवळपास निश्चित झाले आहे. अॅपलच्या सीईओच्या म्हणण्यानुसार, ही कार सेल्फ ड्रायव्हिंग असेल. ही कार बनवण्यासाठी अॅपलने जगातील सर्वोत्तम ऑटोमोबाईल कंपन्यांच्या इंजिनिअर्सची टीम तयार केली आहे. याबद्दलच अधिक माहिती अजनून घेऊ.
अॅपल कार तंत्रज्ञान (apple car technology)
अॅपलच्या कारमध्ये जबरदस्त हार्डवेअर, टॉप नोज सॉफ्टवेअर आणि जबरदस्त सिक्युरिटी फीचर्स ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच अॅपलची कार तुमच्या डिव्हाइसवरूनही ऑपरेट केली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. एका रिपोर्ट्सनुसार, कंपनीने आपल्या कार बनवण्याच्या या प्रकल्पाचे नाव 'टायटन' ठेवले आहे. या कारमध्ये वापरलेली चिप तैवानमध्ये बनवता येत आहे. कारण कंपनी इथून आपल्या इतर उत्पादनांसाठी चिप्स बनवते.
तुमच्या मूडनुसार धावेल अॅपल कार (Apple car will run according to your mood)
या कारमध्ये ऑटोपायलट सारखे फीचर मिळू शकते. तसेच ही स्मार्ट कार तुमचा मड लक्षात घेऊन धावेल, असे तंत्रज्ञान यात दिले जाऊ शकते. तुम्ही तणावग्रस्त असताना कार चालवण्याचा मार्ग आणि चांगल्या मूडमध्ये कार चालविण्याचा मार्ग भिन्न असेल. तसेच हे देखील शक्य आहे की, कारमध्ये असे तंत्रज्ञान दिले जाऊ शकते, जे तुमच्या शरीराच्या हालचालीवर देखील लक्ष ठेवेल.
अॅपल कार टेस्ट (apple car testing)
या ऑटो पायलट कारच्या टेस्टसाठी कंपनीने सरकारकडून परवानगीही घेतली आहे. अमेरिकेत अनेक वेळा रस्त्यांवरील अनेक गाड्यांवर टेस्टिंग डिव्हाईस सारखी मशीन दिसली आहे. ज्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, अॅपल आपल्या कारसाठी ऑटो पायलट सॉफ्टवेअरची टेस्ट करत आहे. अॅपलच्या कारच्या टॅक्सीबाबतही अशी चर्चा केली जात आहे की, ही कार तुम्ही टॅक्सी म्हणून बुक केल्यास ती ड्रायव्हरशिवाय तुमच्यापर्यंत येऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅपलने अशी काही पेटंट दाखल केली आहे जी कारमध्ये वापरली जाणार आहेत. जसे की पॉवर शेअरिंग (दुसर्या कारसह रस्त्यावर फिरणाऱ्या कारचा पॉवर शेअरिंग पर्याय). त्याचबरोबर अॅपलच्या कारमध्ये इतर गाड्यांप्रमाणे स्टिअरिंग आणि पेडल्स असण्याची शक्यता कमी आहे. या कारचे दरवाजे मॅन्युअल बंद करण्याऐवजी स्वयंचलित असू शकतात. अॅपलमधील चाके सामान्य गाड्यांऐवजी इतर काही डिझाइनची असू शकतात, अशी अपेक्षा आहे.
या गाड्यांशी होणार स्पर्धा (tesla - elon musk)
अॅपल टेस्लासह ऑडी, बीएमडब्ल्यू (BMW), मर्सिडीज यांसारख्या जवळपास सर्व ब्रँडशी स्पर्धा करेल. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील बड्या कंपन्याही चिंतेत आहेत. एका मुलाखतीदरम्यान इलॉन मस्क यांना अॅपलच्या कारबद्दल विचारण्यात आले. तेव्हा मस्क यांनी सांगितले की, अॅपल यावर काम करत आहे. त्यावेळी ते चिंतेत असल्याचं दिसलं.
किंमत आणि लॉन्चिंग (apple car price)
मिळालेल्या माहितीनुसार, अॅपलच्या कारच्या किंमतीबाबत आता तरी काहीही सांगता येणार नाही. तसेच Apple कारची लॉन्चिंग 2024-2028 दरम्यान होण्याची शक्यता आहे.