एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण
लोकसभेच्या तिकीटावरुन नाराज असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली.
मुंबई : लोकसभेच्या तिकीटावरुन नाराज असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सध्या भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या इन्कमिंगमध्ये अब्दुल सत्तारांचे नाव सहभागी होणार का? याबाबत चर्चा सुरु आहे.
सत्तारांना भाजपकडून काही ऑफर आहे का? भाजप सत्तारांना औरंगाबाद लोकसभेतून अपक्ष उभे करुन विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंना मदत करणार का? सत्तार भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार का? असे प्रश्न सर्वांनाच पडले आहेत.
औरंगाबाद लोकसभा तिकीट वाटपावरुन काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली होती. काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या घोषित उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारले आहे. सुभाष झांबड यांना पक्षाने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत स्वतः लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभे राहणार असल्याचे सत्तार त्यांनी म्हटले आहे.
सत्तार यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. याबाबत सत्तार म्हणाले की, यापूर्वीच मी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे माझा राजीनामा दिला आहे. तीस वर्ष पक्षाची सेवा केल्यानंतर पक्ष लोकसभेचे तिकीट देईल असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेत असल्याचे सत्तार यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement