एक्स्प्लोर
धक्कादायक! औरंगाबादेत वापरलेल्या हॅन्डग्लोजचा मोठा साठा जप्त
औरंगाबाद आणि नवी मुंबई पोलिसांनी वाळूज भागातील गोडाउनमध्ये वापरलेल्या हॅन्डग्लोजचा मोठा साठा जप्त केलाय. धक्कादायक म्हणजे हे हॅन्डग्लोज धुवून पुन्हा बाजारात आणले जात आहेत.
औरंगाबाद : नवी मुंबई क्राईम ब्रांचतर्फे वैद्यकीय हॅन्डग्लोजचे पुनर्वापर करुन त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. हे सगळे वापरलेले हॅन्डग्लोज औरंगाबादच्या वाळूज भागातील एका गोडाउनमध्ये वापरण्यायोग्य केले जात होते. औरंगाबाद आणि नवी मुंबई पोलिसांनी या गोडाऊन मधून मोठा साठा जप्त केलाय.
औरंगाबाद जवळील वाळूज एमआयडीसी भागात एका गोडाउनमध्ये वापरलेल्या हॅन्डग्लोजचा मोठा साठा औरंगाबाद आणि नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलाय. एकीकडे कोरोनाच्या महामारीच संकट आहे, कोरोना महामारीचा सामना सगळं जग करत आहे. मात्र, दुसरीकडे काही नराधम नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत. वापरलेल्या हॅन्डग्लोजचा पुनर्वापर करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोरोना काळात सर्वच नागरिक आपल्या सुरक्षिततेसाठी जमेल तेवढ्या उपाययोजना करत आहेत. वैद्यकिय क्षेत्रातील नागरिकांनी वापरलेले हेच हॅन्डग्लोज जमा करून वॉशिंग मशीन मध्ये केमिकल टाकून धुवून त्याचा पुनर्वापर करणाऱ्या टोळीचा नवी मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला.
खळबळजनक... नवी मुंबईत तब्बल 3 टन वापरलेल्या हॅन्डग्लोव्जचा साठा जप्त, औरंगाबाद कनेक्शन उघड
या गोडाऊनमध्ये वापरले लाखो हॅन्डग्लोज आहेत. हा माल तब्बल 19 टन आहे. हा माल राज्य आणि राज्या बाहेरील मोठ्या रुग्णालयातून आला आहे. खरं तर हा साठा आला कोठून हा प्रश्न आहे. वाळूजच्या गोडाऊनमध्ये वापरण्या योग्य असलेले मास्क वेगळे केले जातात. यासाठी आजूबाजूंच्या महिलांना हे काम दिले जात होतं. केवळ नागरिकांच्याच नाही तर या महिलांच्या आरोग्याशी देखील इथं खेळ सुरू होता. वाळूजच्या साजापुर भागातील गट नंबर 53 मध्ये हा सावळा गोंधळ सुरू होता.
पोलिसांकडून मुद्देमाल जप्त
वापरलेले हॅन्डग्लोज धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या 2 वॉशिंग मशीन व हॅन्डग्लोज सुकविण्यासाठी वापरण्यात आलेले 3 ब्लोअर मशीन असे एकूण 6 लाख 10 हजार 720 रुपयांचा माल यापूर्वीच नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलाय. पुनर्वापरासाठी धुतलेले हॅन्डग्लोज बिहार, राजस्थान, आसाम, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी पाठवण्यात येणार होता. त्यामुळे राज्यात असे किती ठिकाणी या लोकांनी वापरलेले हॅन्डग्लोजचा साठा ठेवला आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत.
#Tablighi तबलिघी जमातसाठी गेलेल्यांमुळे कोरोनाचा फैलाव हा मीडियाचा प्रपोगंडा -औरंगाबाद खंडपीठ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement