एक्स्प्लोर

खळबळजनक... नवी मुंबईत तब्बल 3 टन वापरलेल्या हॅन्डग्लोव्जचा साठा जप्त, औरंगाबाद कनेक्शन उघड

वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी वापरलेले हॅन्डग्लोव्ज जमा करून वॉशिंग मशीनमध्ये केमिकल टाकून हॅन्डग्लोव्ज धुवून त्यांचा पुनर्वापर करणाऱ्या टोळीचा नवी मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केलाय.

नवी मुंबई : नवी मुंबई क्राईम ब्रांचने हॅन्डग्लोव्जचा पुनर्वापर करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरात एका गोडाऊनमध्ये छापा टाकत क्राईम ब्रांचने तब्बल 3 टन वापरलेल्या हॅन्डग्लोव्जचा साठा जप्त केलाय. 4 लाख नग हॅंडग्लोव्ज औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीमधून नवी मुंबईत आल्याने या मागे मोठी टोळी कार्यरत असल्याचे समोर येत आहे. कोरोना काळात सर्वच नागरिक आपल्या सुरक्षिततेसाठी जमेल तेवढे उपाययोजना करत आहेत. त्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर व इतर कर्मचारी हे सुरक्षिततेसाठी हॅन्डग्लोव्जचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांनी वापरलेले हेच हॅन्डग्लोव्ज जमा करून वॉशिंग मशीनमध्ये केमिकल टाकून हे हॅन्डग्लोव्ज धुवून त्याचा पुनर्वापर करणाऱ्या टोळीचा नवी मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केलाय. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी कारवाई असून यामध्ये तब्बल 4 लाख वैद्यकीय वापर केलेले हॅन्डग्लोव्ज धुवून पुन्हा वापरात आणणाऱ्या टोळीचा मुख्य आरोपी प्रशांत सुर्वेला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत तब्बल 263 गोणी वापरलेले हॅन्डग्लोव्ज, ते धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या 2 वॉशिंग मशीन व हॅन्डग्लोव्ज सुकविण्यासाठी वापरण्यात आलेले 3 ब्लोअर मशीन असा एकूण 6 लाख 10 हजार 720 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीने हा माल औरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसी मधून आणला होता. त्यामुळे आता मराठवाड्यात ही टोळी कार्यरत आहे का? याचा तपास करण्यासाठी नवी मुंबई क्राईम ब्रॅंचची टीम औरंगाबादला जाणार आहे. हे धुतलेले हॅन्डग्लोव्ज पुनर्वापरासाठी बिहार, राजस्थान, आसाम, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी पाठवण्यात येणार होते. मात्र याची डिलिव्हरी व्हायच्या आधीच पोलिसांनी छापा टाकल्याने याचा भांडाफोड झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget