एक्स्प्लोर

SSC Board Exam 2022 : दहावीचं हॉलतिकीट 30 हजार रुपये, 10 हजार घेताना संस्थाचालकाला अटक, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

SSC Board Exam 2022 : दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट देण्यासाठी 30 हजार रुपये मागणाऱ्या एका संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

SSC Board Exam 2022 : आजपासून दहावीची परीक्षा (SSC Board) सुरु होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे. याबाबत औरंगाबादमध्ये खळबळ माजवणारी घटना घडली आहे. दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट देण्यासाठी 30 हजार रुपये मागणाऱ्या एका संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

कलावतीदेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एस. पी. जवळकर यांनी एका बहिःस्थ विद्यार्थ्यांकडे 30 हजार रुपयांची मागणी केली. हॉलतिकीट देण्यासाठी आणि परीक्षेत मदत करण्यासाठी  बहिःस्थ परीक्षार्थ्याकडे त्यांनी 30 हजार रुपये मागितल्यानंतर 10 हजार रुपये स्वीकारताना त्यांना पोलिसांनी अटक केली. शाळेतील लिपिक सविता खामगावकर यादेखील लाचखोरीत सहभागी असल्यानं त्यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आधीच कोरोनामुळे गेली दोन वर्ष दहावीच्या परीक्षा ऑफलाईन झाल्या नाहीत. तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा होणार आहेत. दोन वर्ष कोरोनामुळे शाळा बंद, ऑनलाईन वर्ग यांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात आधीच अनेक प्रश्न आहेत. अशातच अशा प्रकारांमुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. 

दरम्यान, राज्यात आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे. 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. दरम्यान, दहावीच्या परीक्षार्थिंना वेळ वाढवून देण्यात आला आहे. दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटं तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board Of Secondary & Higher Secondary Education) वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च एप्रिल 2022 दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या परिस्थितीत दहावी परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती. त्यामुळे दोन वर्षानंतर दहावी परीक्षा घेतली जात आहे. यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेला 16,39,172 विद्यार्थी बसणार आहेत. दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण 22,911 शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून राज्यातील 21,284 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. आज पहिला पेपर हा प्रथम भाषेचा असणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra SSC Exams 2022 : ऑल द बेस्ट! दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात, विद्यार्थ्यांना पेपरसाठी वाढीव वेळ

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Chhatrapati Sambhajinagar Crime: शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget