एक्स्प्लोर
झोमॅटोवरून मागवली पनीर चिली, मिळाली प्लास्टिकची चिली!
सचिन जगधडे असे तक्रार करणाऱ्या ग्राहकाचे नाव आहे. काल सायंकाळी त्यांनी झोमॅटो वरून पनीर चिली आणि इतर काही पदार्थांची ऑर्डर केली होती. मात्र घरी आल्यानंतर जेवताना पनीर तुटत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर नीट निरखून पाहिलं असता संबंधित पदार्थ हा पनीर नसल्याचं लक्षात आलं.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात एका ग्राहकाने झोमॅटोवरून पनीर चिली मागवली असता त्यांच्या घरी थेट प्लास्टिकचे तुकडे पोचले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत जिन्सी पोलीस ठाण्यात झोमॅटो आणि हॉटेल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सचिन जगधडे असे तक्रार करणाऱ्या ग्राहकाचे नाव आहे. काल सायंकाळी त्यांनी झोमॅटो वरून पनीर चिली आणि इतर काही पदार्थांची ऑर्डर केली होती. मात्र घरी आल्यानंतर जेवताना पनीर तुटत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर नीट निरखून पाहिलं असता संबंधित पदार्थ हा पनीर नसल्याचं लक्षात आलं.
त्यानंतर सचिन जगधडे यांनी संबंधित हॉटेल गाठून चौकशी केली असता हॉटेल चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ग्राहक जगधडे यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हॉटेल एस स्क्वेअर असं या हॉटेलचं नाव आहे. तर प्लास्टिक सदृश असणारा पदार्थ एफडीएकडे तपासणीसाठी दिला असल्याची माहितीही जमधडे यांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज