एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार, औरंगाबादच्या नगरसेवकावर चाकणमध्ये गुन्हा
सय्यद मतीन हा एमआयएमचा वादग्रस्त नगरसेवक असून पक्षविरोधी कारवाई केल्याने त्याची हकालपट्टी केली आहे.
![बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार, औरंगाबादच्या नगरसेवकावर चाकणमध्ये गुन्हा Men threaten women with gun and Rape in pimpri chinchwad, Aurangabad corporator arrested बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार, औरंगाबादच्या नगरसेवकावर चाकणमध्ये गुन्हा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/13014056/Chakan-Police-Station-Pune-Pimpri-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी चिंचवड : बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवक सय्यद मतीन याच्यावर पिंपरी चिंचवडच्या चाकण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये ही त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सय्यद मतीन हा एमआयएमचा वादग्रस्त नगरसेवक असून पक्षविरोधी कारवाई केल्याने त्याची हकालपट्टी केली आहे.
याशिवाय सय्यद मतीनचा मेहुना हामीद सिद्दीकी आणि भाऊ मोहसीन रशिद सय्यद यांच्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याचा दावा या महिलेने केला आहे.
VIDEO | मुलुंडच्या नवघरमधील एटीएममध्ये तरुणाचे अश्लील चाळे | मुंबई | एबीपी माझा
तक्रारदार महिला चाकणमध्ये राहते. सय्यद मतीनने आपल्याला राहत्या घरातून नेत अनेक ठिकाणी बलात्कार केल्याचं तिने म्हटलं आहे. 26 नोव्हेंबर 2018 ते 24 फेब्रुवारी 2019 या काळात लोणावळ्याच्या वॉटर पार्क, कृष्णानगर रेसिडेंसी, बारामती, टाऊनहॉल, शरणापूर येथ गिरीजा लॉजिंग आणि औरंगाबादच्या हर्सुल इथल्या घरात आरोपींनी गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
तसंच आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवत कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचं महिलने सांगितलं. सय्यद मतीनचा मेहुणा हामीद आणि भाऊ मोहसीन यांनी औरंगाबाद इथे विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion