एक्स्प्लोर

Business Idea: काय म्हणता 'या' हॉटेलमध्ये आई-वडिलांसोबत आलेल्या मुलांना मिळते फुकट जेवण

हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी वाढवण्याकरीता हॉटेल व्यावसायिकाचा भन्नाट उपक्रम.

Business Idea: आपल्या विशेष जेवणामुळे अनेक हॉटेल ओळखल्या जातात. तर काही हॉटेल भन्नाट अशा आगळ्यावेगळे उपक्रम राबवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. औरंगाबादमध्ये अशीच एक हॉटेल असून, या हॉटेल मालकाने ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर ठेवली आहे. हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या आई-वडिलांसोबत असलेल्या मुलांना पोटभर फुकट जेवण दिले जाते. 

औरंगाबाद-कन्नड रस्त्यावरील टोलनाक्या पुढील शिवराई फाट्याजवळ सद्गुरू कृपा हॉटेल लागते. अनिल बाबुराव वायडे असे या हॉटेलच्या मालकाचे नाव आहे. सुरवातीला छोटीशी नाश्त्याची हॉटेल सुरु करणाऱ्या वायडे यांनी दहा वर्षांपूर्वी डाळबट्टी बनवायला सुरवात केली. पाहता-पाहता त्यांचा व्यवसाय एवढा वाढला की, आज दिवसभरात 1 क्विंटल बट्टी आणि 50 किलो डाळीचे 200 लिटर वरण दिवसभरात लागते. पण यापेक्षा त्यांच्या जबरदस्त ऑफरमुळे येथे ग्राहकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. कारण जेवणासाठी आलेल्या कुटुंबातील आई-वडिलांसोबत आलेल्या मुलांच्या जेवणाचे ते पैसे घेत नाही. त्यामुळे लोकं कुटुंबासोबत जेवण्यासाठी येथे नेहेमीच पसंती देताना पाहायला मिळतात. 

यामुळे देतात मुलांना मोफत जेवण... 

आपल्या हॉटेलमध्ये आलेल्या मुलांना जेवण मोफत देण्यामागचं कारण सांगताना अनिल वायडे म्हणतात की, बऱ्याच दा जेवणासाठी आलेल्या महिला थाळीचे जास्त पैसे लागतील म्हणून मुलांसमोर थाळी लावू देत नाही. त्यामुळे त्यांचही जेवण व्यवस्थित होत नाही. तर बऱ्याचवेळा सगळ्याच्या थाळीचे पैसे लागतील म्हणून निघून जातात. त्यामुळे आई-वडिलांसोबत असलेल्या लहान मुलांचे आपण पैसे न घेण्याचा आपण निर्णय घेतल्याच वायडे सांगतात. तसेच यामुळे आई-वडील सुद्धा निवांत जेवण करतात असेही वायडे म्हणाले. 

असा असतो मेनू... 

वायडे यांच्या हॉटेलमध्ये शाकाहारी जेवण मिळते. ज्यात गरमा-गरम डाळबट्टीचा समावेश आहे. चार प्रकारच्या डाळी, जिरा, मोहरी,अद्रक-लसूण अस सर्व मिळून वरण बनवले जाते. सोबतच शिरा, तरी,हिरवी मिरची आणि लिंबू कांदा सोबतीला असतो. 80 रुपयात पोटभर डाळबट्टी तुम्ही इथं खाऊ शकतात. त्यामुळे या हॉटेलमध्ये नेहेमीच गर्दी पाहायला मिळते.  

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Chhatrapati Sambhajinagar Crime: शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget