एक्स्प्लोर

नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 

छत्रपती संभाजी नगर येथील MIM चे नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अजामीनपात्र वॉरंट काढल्याने मतीन पटेलवर कारवाई करण्यात आली आहे.

Nashik TCS Case :  नाशिक टीसीएस प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील MIM चे नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अजामीनपात्र वॉरंट काढल्याने मतीन पटेलवर कारवाई करण्यात आली आहे. TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका मतीन पटेलवर ठेवण्यात आला आहे.  

निदा खानला मदत केल्याचा ठपका

निदा खानला मदत केल्या प्रकरणी मतीन पटेलची SIT कडून तीन वेळा चौकशी करण्यात आली आहे. नाशिक रोड न्यायालयाने NBW वॉरंट काढल्याने मतीन पटेल याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयात सुनावणी दरम्यान हजर न राहिल्याने मतीन पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. नाशिक पोलिसांकडून उद्या दुपारी मतीन पटेल ला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. TCS प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याचा मतीनवर आरोप असून त्यांच्या मोबाईल फोन मधील डेटा देखील SIT कडून चौकशी दरम्यान जप्त  करण्यात आला आहे. 

नाशिक TCS नेमकं काय आहे प्रकरण?

नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बीपीओ युनिटमधील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ, मानसिक व शारीरिक अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार मार्च 2026 मध्ये समोर आला. या प्रकरणी गुन्हे दाखल होऊन एसआयटीमार्फत (SIT) तपास झाला असून काही आरोपींना अटक व नंतर जामीन मंजूर झाला आहे. महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी त्रास देणे, लैंगिक शोषण करणे आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. काही संशयितांवर (मुख्य आरोपी निदा खानसह इतरांवर) कर्मचारांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा व दबाव आणल्याचा आरोप आहे.  टीसीएसने दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण (POSH) कायद्याची योग्य अंमलबजावणी न झाल्याचा अहवाल दिला आहे.  पोलिसांनी गुन्हे नोंदवून तपास केला असून, मुख्य संशयित निदा खान व इतर काही जणांना न्यायालयाने अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. कंपनीतील ज्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांचं कंपनीनं निलंबन केलं गेलंय. तसंच, एका निवेदनाद्वारे कंपनीनं स्पष्टीकरण देत तपासात सहकार्य करत असल्याचं सांगितलंय. या प्रकरणी सर्वात पहिला गुन्हा दाखल झाला, त्यावेळी एफआयआरमध्ये पीडित महिलेनं अनेक गंभीर आरोप केले आहेत.

 
 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
जरांगे पाटलांना इतरांनी अभ्यासाची भूमिका मांडलेलं चालत नाही; बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे भोर स्पष्टच बोलले
जरांगे पाटलांना इतरांनी अभ्यासाची भूमिका मांडलेलं चालत नाही; बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे भोर स्पष्टच बोलले
Nashik News: ‘रस्त्यांच्या कामात चूक दाखवा, मी नाव बदलेन’; नाशिक महापालिका आयुक्तांचे टीकाकारांना ओपन चॅलेंज
‘रस्त्यांच्या कामात चूक दाखवा, मी नाव बदलेन’; नाशिक महापालिका आयुक्तांचे टीकाकारांना ओपन चॅलेंज
Nashik Accident News: त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाताना गर्दीत धक्का लागला, खाली कोसळली अन् ST बसचं चाक अंगावरून गेलं; 17 वर्षीय युवतीचा मृत्यू, नाशिकमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना
त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाताना गर्दीत धक्का लागला, खाली कोसळली अन् ST बसचं चाक अंगावरून गेलं; 17 वर्षीय युवतीचा मृत्यू, नाशिकमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना
Advertisement

व्हिडीओ

Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha
Advertisement
Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदीर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Sai Tamhankar On Motherhood: 'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
Embed widget