एक्स्प्लोर

Aurangabad: लग्नातील फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे शेजारच्या शेतातील उभा ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Aurangabad Fire News: या आगीच्या घटनेत शेतकऱ्यांचा जवळपास दहा एकर ऊस जळून खाक झाला आहे.

Aurangabad Fire News: औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज भागातील लिंबेजळगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतातील उभा ऊस (Sugarcane) जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे बाजूलाच सुरु असलेल्या एका लग्न समारंभात (Wedding Ceremony) करण्यात आलेल्या फटाक्यांच्या (Fireworks) आतिषबाजीमुळे ही आग (Fire) लागली असल्याचं समोर आले आहे. ज्यात एकूण पाच शेतकऱ्यांचा अंदाजे सहा लाखांचा ऊस जळून खाक झाला आहे. अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) प्रयत्नाने अखेर आग विझवण्यात यश आले. तर या आगीची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लिंबेजळगाव शिवारातील गट क्रमांक 33 मधील शेतकरी चंद्रशेखर त्रिंबक आलोने, सुरेश त्रिंबक आलोने, अवंतिका त्रिंबक आलोने, दत्तात्रय हरिभाऊ आलोने व गट क्रमांक 17 मधील सुलेमान मोहम्मद खान या शेतकऱ्यांचा जवळपास दहा एकर क्षेत्रात ऊस लावलेला होता. यातील अधिकांश ऊस तुटून कारखान्याला गेला होता. तर काही ऊस बेणे म्हणून लावण्यासाठी तसाच उभा होता. दरम्यान रविवारी या ऊसाला अचानक आग लागली. ऊसाला आग लागल्याची माहिती मिळाल्याने शेत मालकासह परिसरातील शेतकयांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच वाळूज पोलिसांना माहिती देऊन अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या दोन बंबच्या मदतीने अखेर आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झाले होते. 

लग्नातील फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे आग 

शेताजवळच असलेल्या गुरु सृष्टी लाँन नावाचे मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयात रविवारी दुपारी लग्नाचा कार्यक्रम होता. वरात लग्न मंडपात येताच फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. यातील काही फटाके उडून ऊसात पडले आणि ही आग लागली असा आरोप शेतकरी चंद्रशेखर आलो यांनी केला आहे. तर आगीची माहिती मिळताच तलाठी विजय गिरबोणे यांनी या आगीचा पंचनामा केला. ज्यात पूर्ण वाढलेला उभा ऊस व ठिबकचे पाईप असे अंदाजे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

घटनेची पोलिसात नोंद... 

उसाला आग लागल्याची माहिती मिळताच औरंगाबाद महानगर पालिका व वाळूज एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. तोपर्यंत बराचसा ऊस जळून खाक झाला होता. तर या घटनेची नोंद वाळूज पोलिसात करण्यात आली आहे. 

धक्कादायक! औरंगाबादेत पार्टी करण्यासाठी निघालेल्या तरुणाचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू; गावात भीतीचे वातावरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget