Shiv Sena Symbol: कागदपत्र न पाहताच निवडणूक आयोगाने निकाल दिला; खैरेंचा गंभीर आरोप
Shiv Sena :आज शिवसेनेचं नावं सुद्धा घेऊन नयेत याचा खूप दुःख होत असल्याचे खैरे म्हणाले.
Shiv Sena Symbol: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं असून,शिवसेना नाव सुद्धा वापरता येणार नसल्याचा निकाल दिला आहे. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असून, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. आमचे कोणतेही कागदपत्रे न पाहता निवडणूक आयोगाने कुणाच्या तरी दबावाखाली हा निर्णय दिला असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालावरून त्यांच्यावर पहिल्यांदाच खैरे यांनी थेट आरोप केले आहे.एबीपी माझाला प्रतिक्रिया देतांना खैरे यांनी हे आरोप केला आहे.
यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की,बंडखोर आमदारांच्या बडतर्फ करण्याबाबत न्यायालयात सुनावणी सुरु असताना घाईघाईने निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. काल आम्ही कागदपत्रे सादर केले आणि आम्ही त्यांना वेळ मागून घेतला. मात्र आमची कोणतेही कागदपत्रे न पाहता निवडणूक आयोगाने कुणाच्या तरी दबावाखाली हा निर्णय दिला असल्याचा माझा स्पष्ट आरोप असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले आहे.
पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, अशा पद्धतीने जर निवडणूक आयोग वागत असेल तर काय समजायला हवेत. कित्येकदा आम्ही निवडणूक आयोगाकडून अपेक्षा व्यक्त करत असतो,पण आज आम्हाला कळून आले की हे काही बरोबर नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना सुरु केली. आज शिवसेनेचं नावं सुद्धा घेऊन नयेत याचा खूप दुःख होत असल्याचे खैरे म्हणाले. तर उद्धव ठाकरे आजारी असतानाच या लोकांनी डावपेच जास्तप्रमाणे करण्यात आले. एकनाथ शिंदे यांचे डावपेच अनेक वर्षांपासून सुरु होते. आता आनंद दिघे असते तर यांना उलटे टांगले असते. मात्र ते गेल्यावर यांच्यात हवा आली. आज शिवसेना फोडण्याचा पाप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. माझा स्पष्ट आरोप आहे शिंदे यांच्यावर आहे.
निवडणूक आयोगाकडून चाचपणी
शिवसेनेला कसं संपवायचे हे सर्व डावपेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रचले होते. एकनाथ शिंदे गटातील आमदार आता मात्र त्रस्त होऊ लागले आहे. अंधेरी विधानसभेसाठी हा निर्णय घेऊन निवडणूक आयोगाकडून चाचपणी करतायत, त्यानंतर हा निर्णय कायम ठेवण्याचा डाव निवडणूक आयोगाचा असल्याचा आरोपही खैरे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या...
Shiv Sena Symbol: निवडणूक आयोगाला एवढी कसली घाई होती, अंबादास दानवेंची खोचक प्रतिक्रिया
Aurangabad News : शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण