एक्स्प्लोर

Aurangabad News : शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे पाहायला मिळालं.

Aurangabad News : सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे पाहायला मिळालं. दोन्ही नेते एकाच गाडीतून गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये (Aurangabad) ज्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार थांबले आहेत, त्याच हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सुध्दा काही वेळीपूर्वी दाखल झाले होते. त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला.

राज्यात कालपासून विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे गट आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. यातच काल शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं गोठावलं आहे. तसेच शिवसेना हे नाव देखील दोन्ही गटांना वापरता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगानं दिला आहे. यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. यावरुन दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आज आणखी एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. ती म्हणजे शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांची. या दोन्ही नेत्यांनी औरंगाबादमध्ये एकाच गाडीतून प्रवास केला आहे. 

दोन्ही नेते एकाच गाडीतून गेवराईकडे रवाना

शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे औरंगाबादहून गेवराईच्या दिशेने गेले आहेत. गेवराईत आज माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत. शिवजारीव पंडीत हे शरद पवार यांच्या निष्ठावंत सहकारी आहेत. त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज गेवराईत होणार आहे. या सोहळ्याला शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांच्यासह सर्वच पक्षातील दिग्गज नेते उपस्थिती लावणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे, माजी मंत्री दिलीप  वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री सुरेश धस, माजी मंत्र दिलीपराव देशमुख, आमदार नमिता मुंदडा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सAkshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Embed widget