New Year Celebration: औरंगाबादकरांनो नवीन वर्षाच्या जल्लोषाची तयारी करतायत?; आधी पोलिसांच्या 'या' सूचना समजून घ्या
New Year 2023: नागरिकांना नवीन वर्षाच्या जल्लोषावेळी बेकायदेशीर कृत्य टाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
![New Year Celebration: औरंगाबादकरांनो नवीन वर्षाच्या जल्लोषाची तयारी करतायत?; आधी पोलिसांच्या 'या' सूचना समजून घ्या maharashtra News Aurangabad News New Year 2023 Aurangabad City Police Notification on New Year Celebrations New Year Celebration: औरंगाबादकरांनो नवीन वर्षाच्या जल्लोषाची तयारी करतायत?; आधी पोलिसांच्या 'या' सूचना समजून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/d674d01894106a93a5cad7d2f08921ca167239724171989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
New Year 2023: नवीन वर्षासाठी अवघ्या काही तासांचा वेळ शिल्लक राहिले असून, देशासह जगभरातील नागरिक नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी (New Year Celebration) सज्ज झाले आहेत. दरम्यान औरंगाबाद जिल्हा (Aurangabad District) देखील नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी 31 डिसेंबरची वाट पाहत आहे. मात्र याचवेळी नवीन वर्षाच्या जल्लोषाची तयारी करणाऱ्यांसाठी औरंगाबाद शहर पोलिसांकडून (Police) काही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त निखील गुप्ता (Aurangabad City Police Commissioner Nikhil Gupta) यांनी याबाबत एक व्हिडिओ (Video) जारी केला असून, ज्यात नागरिकांना नवीन वर्षाच्या जल्लोषावेळी बेकायदेशीर कृत्य टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त यांनी यावेळी आवाहन करतांना म्हटले आहे की, 31 डिसेंबरला सर्वच नागरिक नवीन वर्षाची वाट पाहत असतात आणि आपापल्या पद्धतीने नवीन वर्षे साजरा करत असतात. मात्र हा सण साजरा करतांना कोणालाही नुकसान किंवा इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे औरंगाबाद शहर पोलिसांकडून काही सूचना देण्यात येत असून, याचे पालन नागरिकांनी करावे असेही पोलीस आयुक्त म्हणाले आहेत.
पोलीस आयुक्तांच्या सूचना
- लॉउडस्पीकर,ढोल किंवा ध्वनिप्रदूषण करणारे कोणतेही वाद्य रात्री 12 वाजेनंतर वाजवता येणार नाही.
- तसेच 12 वाजेच्या आधी सुद्धा वृद्ध, विध्यार्थी, लहान मुलं यांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
- तरुणांनी रस्त्यावर धूम स्टाईल वाहने चालवून यामुळे कोणालाही त्रास होईल असे वागू नयेत.
- ट्रिपल सीट कोणेही दुचाकीवरून फिरतांना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.
- चारचाकी गाडीच्या वरती किंवा टपावर बसून वाहने चालवू नयेत.
- दारू पिऊन कोणतेही वाहन चालवू नयेत,अन्यथा कारवाई करण्यात येईल.
- शहरातील रस्त्यांवर कोणेही धांगडधिंगाणा करत असेल तर असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही.
- नवीन वर्षाचा स्वागत करतांना स्वतःला किंवा इतरांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी...
तसेच पुढे बोलतांना पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले की, नवीन वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी दारू पिली आहे का? याची तपासणी केली जाईल. शहरातील सर्वच भागात पोलिसांची गस्त देखील सुरु राहणार आहे. तर हे सर्व शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही पाऊले उचलत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त निखील गुप्तां यांनी केले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागही लक्ष ठेवून!
पोलिसांप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील नवीन वर्षाच्या निमित्ताने सतर्क झाले आहे. शासनमान्य परमीट रुम, मद्यविक्रीच्या दुकानांना आदेशानुसार शिथिलता देण्यात येईल. मात्र, अवैधरीत्या दारूविक्री, ढाब्यांवर ग्राहकांना दारू उपलब्ध करून देणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाईल. त्यासाठी आमची सात पथके नियुक्त असून ती पहाटेपर्यंत गस्तीवर असतील, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)