Happy New Year 2023 : भारतात 31 डिसेंबरला 12 वाजता 'Happy New Year'ची सुरुवात; 'या' देशांत त्याआधीच सेलिब्रेशन
Happy New Year 2023 : 31 डिसेंबरच्या काही तास आधी बऱ्याच देशांत नवीन वर्ष साजरे केले जाते.
![Happy New Year 2023 : भारतात 31 डिसेंबरला 12 वाजता 'Happy New Year'ची सुरुवात; 'या' देशांत त्याआधीच सेलिब्रेशन happy new year 2023 new year celebration time in the world marathi news Happy New Year 2023 : भारतात 31 डिसेंबरला 12 वाजता 'Happy New Year'ची सुरुवात; 'या' देशांत त्याआधीच सेलिब्रेशन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/29/7d9537f2543dc289f8035fc29dbad8d11672320918007358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Happy New Year 2023 : डिसेंबर महिना संपत आला आहे. नवीन वर्षाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebration) लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. प्रत्येकजण हा दिवस आपापल्या पद्धतीने साजरा करतो. या दिवशी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक संकल्पदेखील केले जातात. 31 डिसेंबरच्या रात्रीपासून सुरू होणारा नवीन वर्षाचा आनंद पुढील दोन दिवस चालतो. जगभरातील बहुतेक लोक 31 डिसेंबरच्या रात्रीच नवीन वर्ष साजरे करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की 31 डिसेंबरच्या काही तास आधी बऱ्याच देशांत नवीन वर्ष साजरे केले जाते.
'या' देशात आधी साजरा होतं नवीन वर्ष
भारतीय वेळेनुसार आपल्या देशात 31 डिसेंबरला रात्री बरोबर 12 वाजता नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. मात्र, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि रशियाच्या काही भागांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत काही तास आधीच म्हणजेच भारतीय वेळेनुसार दुपारच्या वेळेस नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं.
इतर देशांमध्ये नवीन वर्ष किती वाजता सुरू होईल?
दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री 8:30 वाजता नवीन वर्ष सुरू होईल. तर, चीनमध्ये 31 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजता (भारतीय वेळेनुसार) नवीन वर्षाचा उत्सव सुरू केला जातो.
पाकिस्तान आणि इतर भागांत उत्सव कधी सुरू होतील?
भारताच्या शेजारी देशांबाबत बोलायचे झाले तर बांगलादेशात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन भारताच्या आधी साजरे केले जाईल. 31 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजता बांगलादेशात उत्सव सुरू होईल. नेपाळमध्ये रात्री 11.45 वाजता नवीन वर्ष सुरू होईल. पाकिस्तानबद्दल बोलायचे झाल्यास भारतापासून अर्ध्या तासानंतर म्हणजेच 12:30 वाजता येथे नवीन वर्ष साजरे केले जाईल. आशियामध्ये, नवीन वर्ष इराण, इराक आणि तुर्कीमध्ये शेवटचे साजरे केले जाईल.
शेवटी 'येथे' साजरा होतं नवीन वर्ष
इतर देशांनी नवीन वर्षाचं स्वागत केल्यानंतर यूएस मायनर आउटलाइंग बेटावर नवीन वर्षाचा उत्सव सुरू होईल. येथे भारतीय वेळेनुसार,1 जानेवारीच्या संध्याकाळी 5:35 वाजता नवीन वर्ष साजरे केले जाईल. अशा प्रकारे विविध देशांत नवीन वर्षाचं स्वागत केलं जाईल.
महत्त्वाच्या बातम्या :
Holiday Heart Syndrome : न्यू इअर सेलिब्रेशन बनू शकते हार्ट अटॅकचं कारण, काय आहे हे प्रकरण?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)