काय म्हणता! मुंगूस आणि सापाच्या लढाईत चक्क 'रास्ता रोको'
Aurangabad News: साप-मुंगुसच्या लढाईत दहा मिनटासाठी दोन्ही बाजूची वाहतूक थांबली होती.
Aurangabad News: एखांद्या आंदोलनामुळे किंवा वादामुळे रास्ता रोको झाल्याचं आपण अनेकदा आयकलं असेल किंवा पहिलेही असेल. मात्र कधी साप आणि मुंगुसच्या वादामुळे रास्ता रोको झाल्याचं पाहिले आहे का?, पण औरंगाबादच्या वैजापूरमध्ये अशीच एक घटना पाहायला मिळाली आहे. रस्त्याच्या मधोमध नाग फनी वर करून उभा आहे, तर दुसरीकडे दोन हात करण्यासाठी मुंगुसही तयारच होता. त्यामुळे काही वेळेसाठी दोन्ही बाजूने वाहतूक थांबवावी लागली.
साप आणि मुंगुस म्हणजे एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जातात. जीव जाईपर्यंत एकमेकांना सोडत नाही. साप दिसताच मुंगुस त्याच्यावर हल्ला करण्याची संधी सोडत नाही. असाच साप-मुंगुसाच्या लढाईचा 'लाईव्ह' थरार औरंगाबादच्या वैजापूर रोडवर पाहायला मिळाला. औरंगाबाद-वैजापूर रोडवरील गारज येथील ईसाल पेट्रोल पंपासमोर अचानक रस्त्याच्या मधोमध एक नाग येऊन थांबला. नागाला पाहून रस्त्याने जाणारे लोकं सुद्धा थांबले. नाग निघून जाईल असे वाहनधारकांना वाटत असतानाच काही क्षणात दुसऱ्याबाजूने एक मुंगुस सुद्धा आला.
लढाईचा थरार...
नागाला पाहून आलेला मुंगुस काही क्षणात त्यावर तुटून पडला आणि दोघातील लढाईचा थरार सुरु झाला. नाग वरती फनी करून हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा आणि मुंगुस हल्ला चुकवत नागावर तुटून पडायचा. तब्बल दहा मिनटे ही लढाई सुरूच होती. मात्र शेवटी साप आणि मुंगुसाच्या लढाईत नेहमीप्रमाणे मुंगसाचा विजय झाला आणि भल्या मोठ्या नागाला तोंडात धरून मुंगुस घेऊन निघून गेला.
दोन्ही बाजूने वाहतूक थांबली...
एकीकडे नाग आणि दुसऱ्या बाजूला मुंगुस असे युद्ध रस्त्याच्या मधोमध सुरु होते. त्यामुळे साप आणि मुंगुसाच्या लढाईचा रंजक असा थरार पाहण्यासाठी दोन्ही बाजूची वाहने जागेवरच थांबले. अनेकजण हा लाईव्ह थरार आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी प्रयत्न करत होते. मुंगुस आणि नाग दोन्ही एकमेकांवर तुटून पडल्याने रस्त्यावरून गाडी घालण्याची कुणाची हिम्मत होत नव्हती. त्यामुळे तब्बल दहा मिनटे दोन्ही बाजूने वाहतूक थांबली असल्याचे पाहायला मिळाले.