Aurangabad: तब्बल 151 अशैक्षणिक कामे करणाऱ्या शिक्षकांकडून गुणवत्तेची अपेक्षा; शिक्षकाचं बंब यांना खरमरीत पत्र
Aurangabad News: शिक्षकांना करावी लागणारी शालाबाह्य कामांची यादीच एका शिक्षकाने आमदार प्रशांत बंब यांना पाठवली आहे.
Aurangabad News: अनेक शिक्षक मुख्यालयी न राहता घरभाडे उचलत असल्याचा मुद्दा भाजप आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत उचलला होता. त्यानंतर अनेक शिक्षकांनी आमदार बंब यांना फोनवरून जाब विचारला होता. त्यातच आता एका शिक्षकाने आमदार बंब यांना खरमरीत पत्र लिहले असून, शिक्षकांकडून करून घेण्यात येणाऱ्या 151 अशैक्षणिक कामांची यादीच पाठवली आहे. रामचंद्र सालेकर असे या शिक्षकाचे नाव आहे.
सालेकर यांनी बंब यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण शिक्षकांचा पगार घरभाड मुख्यालयी राहत नसल्याची, विद्यार्थ्यांची गुणवत्ता याचा आपण विधानसाभेत उहापोह करुन शिक्षकांवर अनेक आरोप केले. त्यामुळे आपल्यासमोर आमच्या पगाराचा व कार्याचा हिशोब सादर करणं आवश्यक वाटल्याने शिक्षकांचे कार्य विस्ताराने आपल्यापुढे मांडत आहोत. शिक्षकाला विशषतः प्राथमिक शिक्षकावर आपण खोटं मुख्यालयी राहतो असे सांगून घरभाडे घेतात असा आपण आरोप लावला परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो की घरभाडे हा पगाराचाच भाग आहे.
शिक्षकाचा पगार घरभाड काढता तो सुद्धा तुमचं बोट धरुन अक्षर गिरवून तुम्हाला विधानसभेपर्यंत पोहचता आलं ती कोण्यातरी शिक्षकाचीच पुण्याई आहे. त्यांचासुद्धा हा अपमान आहे. बेसीक महागाई घरभाडे सर्वकाही पकडून शिक्षकाचा सद्यस्थितीत सरासरी पगार 60 ते 70 हजार आहे. या पगाराचा हिशोब आपल्यापुढे सादर करीत आहोत.
शिक्षकांना करावी लागणारी शालाबाह्य कामे...
1,- शाळा उघडणे
2,- वर्गखोल्या, परिसर, मुताऱ्या ,संडास स्वच्छ करणे.
3,- घंटी वाजवणे.
4,- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
5,- वर्गखोल्यांची रंगरंगोटी सजावट करणे.
6,- डिजिटल वर्गखोल्या तयार करणे.
निवडणूका
7, - ग्रामपंचायतची निवडणूक पार पाडणे .
8, - पंचायत समितीची निवडणूक पार पाडणे
9, - जिल्हा परिषदची निवडणूक पार पाडणे .
10,- विधानसभेची निवडणूक पार पडणे.
11, -लोकसभेची निवडणूक पार पाडणे .
12, - मतदार याद्या तयार करण्याचे BLO म्हणून काम पार पाडणे.
बांधकामे
13,- ईमारत बांधकाम
14,- संडास मुताऱ्या बांधकाम
15,- हँडवाश स्टेशन बांधकाम
16,- इमारत देखभाल दुरुस्ती
सर्वेक्षणे
17,- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना शाळेत दाखल करून शाळेच्या प्रवाहात आणणे.
18,- संपूर्ण गावाचे वयोगटानुरुप संवर्गारुप साक्षर निरक्षर सह दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण.
19,- जनगणना सर्वेक्षण.
20,- दारिद्रय रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण.
21, - पशुसर्वेक्षण
22, - शौच्छालयाचे सर्वेक्षण
शालेय समित्या स्थापण करणे
23, - शालेय व्यवस्थापण समिती स्थापण करण्यासाठी संपूर्ण निवडप्रक्रीया पार पाडणे.
24,- शा.व्य.स.च्या मासिक सभा व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.
25,- पालक समिति निवड करणे,दरमहा सभा घेणे व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.
26,- मातापालक समिती निवड करणे, दरमहा सभा घेणे ,त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.
27,- शालेय पोषण आहार समिती निवड करणे, दरमहा सभा घेणे, इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.
28, - विद्यार्थीनी सुरक्षा समिती तयार करणे, सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.
29,- तंबाखू व्यसनमुक्त समिती तयार करणे मासिक सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.
30,- तंबाखू मुक्त शाळा घोषीत करणे.
31, - विद्यार्थी परिवहन समिती तयार करणे, मासीक सभा घेणे, इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.
32,- गावातील तंटामुक्त व इतर समित्यांवर पदसिद्ध सदस्य म्हणून मु.अ.ना भुमिका पार पाडावी लागते.
33,- ग्रामसेवकाच्या अनुपस्थीतीत ग्रामसभेचा सचिव म्हणून मु.अ.ना भुमिका निभवावी लागते.
विविध शालेय योजनांची अंमलबजावणी करणे
34,- शालेय पोषण आहार योजने अंतर्गत स्वयंपाकीची व मदतनीसाची निवड करणे.
35, - स्वयंपाकीची व मदतनीसाची करारनामे, बँकखाते, आधार, मेडिकल सर्टिफिकेट इ.दस्तावेज फाईल तयार करुन कार्यालयाला सादर करणे, माहिती ऑनलाईन करणे.
36,- रोजच्या उपस्थितीनुसार शालेय पोषण आहार लाभार्थांची रोजची रोज माहिती आनलाईन करणे.
37, - शालेय पोषण आहार ठेकेदाराकडून प्राप्त साठा मोजून घेणे व सुरक्षित साठवणूक करणे.
38,- प्राप्त साठ्याची नोंदवही 1 मध्ये प्राप्त खर्च शिल्लक साठ्याची नोंद घेणे व ग्रॅमपासूनचा हिशोब ठेवणे.
39, - शिजवलेल्या शालेय पोषण आहाराची मुलांना अर्धा तास वाटपा अगोदर चव घेवून नोंदवही क्र.२ मध्ये नोंद घेवून त्याविषयी अभिप्राय नोंदवणे.
40, - दर तिन माहिण्यांनी प्रत्येक विद्यार्थांची शारीरीक उंची वजन याची नोद घेवून, त्याच्या प्रगतीची नोंद वही क्र.३ मध्ये घेणे.
41,- स्वयंपाकी मदतनीस मानधन अदा करून त्याचे कॅशबुक मेंटन करणे.
42, - शालेय पोषण आहाराच्या वाटपाची, स्वच्छतेची भांडी धुनी व्यवस्था करणे
43,- महिण्याच्या शेवटी संपूर्ण माहितीची डाग तयार करुन पाठवणे.
44,- राजु मिना मंच उपक्रम राबवणे
45,- विद्यार्थ्यांची अफलातुन बँक चालवणे.
आरोग्य खात्यासी सबंधित योजनांची अंमलबजावणी
46,- प्रत्येक मुलांची आरोग्य तपासणी करुन घेणे.
47,- आरोग्य तपासणी कार्डच्या नोंदी ठेवणे.
48,- सर्वप्रकारच्या धनुर्वात रुबेला लसिकरण मोहिम राबविणे.
49,- लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व नोंदी ठेवणे.
50,- दिव्यांग विद्यार्थांसाठी विशेष कृतिकार्यक्रम राबवणे.
51,- राजीव गांधी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी करणे.
52,- अस्मिता योजनेची अंमलबजावणी करणे.
53,- शाळेचा कृतिआराखडा तयार करणे.
विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी
54,- पूर्व उच्च प्राथमिक इयता 5 वी व पूर्व माध्यमिक इयता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करुन घेणे.
55,- नवोदय परिक्षेची तयारी करुन घेणे, फार्म भरणे, हॉल टिकीट काढणे, परिक्षार्थींना परिक्षा केंद्रावर नेआन करण्याची व्यवस्था करणे.
56,- विद्यावेतन शिष्यवृत्ती परिक्षेची वरीलप्रमाणे कार्यवाही करणे.
57,- आदिवासी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीचे सर्व कागदपत्रासह प्रस्ताव तयार करुन आनलाईन करणे.
58,- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन पाठवणे.
59,- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन सादार करणे.
शालेय दस्तावेज अद्यावत ठेवणे
61,- विद्यार्थ्याना दाखल करतांना प्रतीज्ञालेख रजिस्टरमध्ये नोंद घेणे.
62,- विद्यार्थांना दाखल करुन घेणे त्याविषयीची संपूर्ण माहिती दाखल खारीज रजिस्टरमध्ये नोंदवणे.
63,- विद्यार्थांच्या वर्गवार दैनिक उपस्थीती हजेरीची नोंद ठेवणे.
64,- शिक्षक उपस्थीती नोंद रजिस्टर ठेवणे.
65,- चाचण्या सत्र परिक्षा घेवून निकाल रजिस्टर अध्यावत ठेवणे.
66,- प्रमोशन रजिस्टर अध्यावत ठेवणे.
67,- साठापंजी रजिस्टर अद्यावत ठेवणे.
68,- BPLमुलींचा उपस्थीती भत्ता प्रस्ताव रजि.अद्ययावत ठेवणे.
69,- उपस्थिती भत्ता वितरण रजिस्टर आद्यावत ठेवणे.
70,- सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वितरण रजि. अद्यावत ठेवणे.
71,- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती रजिस्टर अद्यावत ठेवणे.
72,- अस्वच्छ कामगारांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्ती नोंद तथा वितरण रजि.अद्यावत ठेवणे.
73,- आवक नोंद रजिस्टर अद्यावत ठेवणे.
74,- जावक नोंद रजि.अद्यावत ठेवणे.
75,- टी,सी.देणे व त्याची नोंद रजिस्टर मेंटन करणे.
76,- व्हिजीट रजिस्टर अद्यावत ठेवणे.
77,- आरोग्य तपासणी रजिस्टर अद्यावत ठेवणे.
लेखादस्तके (कॅशशबुक) जमाखर्च नोंद रजिस्टरे
78,- सर्वशिक्षा अभियान SSA अनुदान गणवेश अनुदान,शाळा अनुदान,बांधकाम,जमा खर्च हिशोब कॅशबुक मेंटन करुन नियमित लेखापरिक्षण करुन घेणे.
79,-खात्यात जमा झालेल्या शिष्यवृत्या उपस्थीती भत्ता वाटप करुन जमा खर्च कॅशबुक मेंटन करणे व नियमित लेखापरिक्षण करुन घेणे.
80,- शालेय पोषण आहार खाते MDM स्वयंपाकिचे जमा मानधन आदा करुन स्वतंत्र कॅशबुक मेंटन करणे व नियमित लेखा परिक्षण करुन घेणे.
81,- शाळा सुधार फंड अंतर्गत लोकवर्गणी गोळा करुन शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण करणे, त्याचे स्वतंत्र कॅशबुक मेंटेन करणे.
82,- प्रत्येक खात्यात जमा झालेल्या हेडवाईज जमा खर्चाच स्वतंत्र रजिस्टर ठेवणे.
83,- नियमित पासबुक नोंदी घेणे.
84,- शाळेचे इलेक्ट्रिक बील भरणे.
85,- मोफत गणवेश योजना कापड खरेदी निविदा मागवणे.
86,- मोफत पाठ्यपुस्तक योजना पटसंख्येनुसार वर्गवार पुस्तकाची मागणी करणे.
87,- प्रत्येक खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र सादर करणे.
ऑनलाईन कामे
88,- शालेय पोषण आहार MDM स्टॉक ऑनलाईन करणे,
89,- दैनंदिन शालेय पोषण आहार लाभार्थांचे ऑनलाईन करणे.
90,- स्कुल पोर्टलची माहिती ऑनलाईन करणे.
91,- विद्यार्थी पोर्टलची माहिती ऑनलाईन करणे.
92,- प्रत्येक विद्यार्थांच्या चाचण्या परिक्षांचे गुण ऑनलाईन करणे
93,- शाळा सिद्धी माहिती ऑनलाईन करणे.
94,- सर्व दाखल विद्यार्थांची माहिती ऑनलाईन करणे.
95,- ऑनलाईन विद्यार्थ्यांना डीटॅच अटॅच करणे.
फाईल
96,- प्रत्येक हेड वाईज कॅशशबुकच्या खर्चाच्या पावत्यांचे स्वतंत्र चिकट फाईल्स तयार करणे.
97,- आवक फाईल
98,- जावक फाईल
99,- प्रत्येक शिष्यवृतीचे स्वतंत्र फाईल
100,- पगार पत्रक फाईल
101,- शालेय पोषण आहार फाईल
102,- टी.सी.फाईल
103,- जन्म तारिख दाखले फाईल
104,- रजा फाईल
105,- आर्डर फाईल
प्रशिक्षणे व इतर उपक्रम
106,- वर्गवार प्रत्येक विषयाची केंद्र ते जिल्हा राज्य स्तरापर्यंतची प्रशिक्षणे
107,- मासिक शैक्षणिक परिषदा
108,- वेळोवेळी मु,अ.सभा
109,- गट सम्मेलने
110,- बिटस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव
111,- तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
112,- जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
113,- पंच तथा इतर समित्यात कार्य
114,- नवरत्न स्पर्धा केंद्रस्तर ते जिल्हास्तरपर्यंत
115, - तंत्रस्नेही प्रशिक्षणे
116, शालेय व्यवस्थापण समित्यांना प्रशिक्षण देणे.
मेळाव्यांचे आयोजन करणे
117,- पालक मेळाव्याचे आयोजन करणे.
118,- महिला मेळाव्याचे आयोजन करणे.
119,- बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणे.
120,- विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन व नियोजन करणे.
121- सांस्कृतिक कार्यक्रमाचे, आयोजन करणे.
122,- राष्ट्रीय सण,वर्षभर सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या प्रभात फेऱ्या काढून साजऱ्या करणे.
अध्यापण कार्य
123,- वार्षिक मासिक नियोजन करणे.
124,- वेळापत्रक तयार करुन त्यानुसार अध्यापण करणे.
125,- नियमित दैनिक टाचन काढणे.
126,- लॉगबुक मेंटन करणे.
127,- मुलांचा गृहपाठ तपासणे.
128,- घटक चाचण्या घेणे.
129,- सत्र परिक्षा घेणे.
130,- पेपर्स तपासणे.
131,- निकालपत्रक तयार करणे.
132,- दैनंदिन नोंदी घेणे.
133,- प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करणे.
134,- निकाल जाहिर करणे.
135,- शाळेत वाचनालय चालवणे
136,- प्रयोगशाळा तयार करणे.
137,- वेगवेगळ्या विषयाचे कोपरे तयार करणे.
138,- घटकानुरुप शैक्षणिक साहित्ये तयार करणे.
139,- संगणक कक्ष तयार करुन विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देणे.
140,-प्रत्येक पालक
141,-सर्व शालेय समित्या
142,-ग्रामपंचायत कमेटी
143,-केंद्र प्रमुख
144,-शिक्षण विस्तार अधिकारी
145,- गटशिक्षणाधिकारी
146,-शिक्षणाधिकारी
147,-मुख्य कार्यपालन अधिकारी
148,-शिक्षण उपायुक्त
149,-शिक्षण आयुक्त
150,-शिक्षण मंत्री......इ.
151,शेवटी वार्षिक शालेय तपासणी.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI