Aurangabad: मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या माध्यमातून राज्यात उद्रेक घडवण्याच्या प्रयत्न; राजकीय पक्षांवर गंभीर आरोप
Aurangabad: मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या माध्यमातून राजकीय पक्ष राज्यात उद्रेक घडवण्याच्या प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी केला आहे.
Aurangabad News: मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) समन्वयकांची गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ क्लिप (Audio Clip) व्हायरल होत आहे, ज्यात काही समन्वयकांनी राज्यातील राजकीय नेत्यांकडून आंदोलनाच्या नावाखाली पैसे उकळण्याचा दावा केला जात आहे. दरम्यान दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या माध्यमातून राजकीय पक्ष राज्यात उद्रेक घडवण्याच्या प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी राज्यातील काही राजकीय नेत्यांकडून आंदोलनाच्या नावाखाली पैसे उकळण्याचा दावा करणाऱ्या संभाषणाची ऑडीओ क्लिप गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. ज्यात रमेश केरे यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून पैसे घेतल्याचा दावा केला गेला आहे. यावरच खुलासा करतांना रमेश केरे यांनी काही गंभीर आरोप केले आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेसह राज्यातील पाचही पक्षाचे हस्तक मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या माध्यमातून पक्ष राज्यात उद्रेक घडवण्याच्या प्रयत्न करत असल्याचा आरोप केरे यांनी केला आहे.
मराठा आरक्षण याचिकाकर्त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा...
राजकीय पक्षांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर केरे यांनी मराठा आरक्षण याचिकाकर्ते, मराठा अभ्यासक आणि समन्वयक यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोबतच त्यांनी मुंबईत काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने काही संघटनेच्या लोकांनी आमदार-खासदार यांच्याकडून 50 कोटी पेक्षा अधिक पैसे जमा केल्याचा दावाही केला आहे.
कोण आहे रमेश केरे?
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील पहिला मोर्चा औरंगाबादमध्ये काढण्यात आला होता. ज्यात रमेश केरे यांची महत्वाची भूमिका होती. मात्र त्यानंतर त्यांनी केलेल्या अनेक मोर्च्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप झाले. दरम्यान गेल्या तीन-चार दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कथित ऑडीओ क्लिपमध्ये केरे यांनी राजकीय नेत्यांकडून आंदोलनाच्या नावाखाली पैसे घेतल्याचा दावा केला जातोय. तर आपल्यावरील सर्व आरोप खोटे असून, राजकीय नेत्यांकडून आपल्याला बदनाम करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं केरे म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या...
मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी घेतले कोट्यवधी रुपये?; कथित ऑडीओ क्लिपने खळबळ