मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी घेतले कोट्यवधी रुपये?; कथित ऑडीओ क्लिपने खळबळ
Audio Clip: एकूण 27 मिनट 25 सेकंदाची या ऑडीओ क्लिपमध्ये मोठमोठे खुलासे करण्यात आले आहे.
Aurangabad News: मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकाची कथित एका ऑडिओ क्लिपने राज्यात खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी राजकीय नेत्यांकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा उल्लेख या ऑडीओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. सोबतच राज्यातील मोठ-मोठ्या नेत्यांच्या नावाचा सुद्धा या क्लिपमध्ये उल्लेख पाहायला मिळत आहे. एकूण 27 मिनट 25 सेकंदाची या ऑडीओ क्लिपमध्ये मोठमोठे खुलासे करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्च्याच्या दोन महत्वाच्या समन्वयकांच्या संभाषणाची ही क्लिप असल्याचा दावा केला जात आहे. मात्र एबीपी माझाने या कथित ऑडीओ क्लिपची कोणतेही सत्यता तपासलेली नाही.
विवेकानंद बाबर आणि आबासाहेब पाटील यांच्यातील ही संभाषणाची ही क्लिप असल्याचा दावा केला जात आहे. ज्यात औरंगाबादचे मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक रमेश केरे यांनी वेळोवेळी राज्यातील काही नेत्यांची भेटी घेऊन पैसे घेतल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे. सोबतच अप्पासाहेब कुढेकर यांच्या नावाचा सुद्धा या क्लिपमध्ये सतत उल्लेख करण्यात आला आहे. एका आंदोलनाबाबत 10 लाख तर एकदा 5 कोटीचा या ऑडीओ क्लिपमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
यापूर्वी अनेकदा आरोप...
विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा अनेकदा मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी उघडपणे एकमेकांवर आरोप केले आहे. मात्र पहिल्यांदाचा थेटपणे एकमेकांची नाव घेऊन नेत्यांकडून पैसे आणल्याचा उल्लेख ऑडिओ क्लिपमधून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या समन्वयकांची नावे या ऑडीओ क्लिपमध्ये आहे, ते सतत राज्यातील महत्वाच्या नेत्यांच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. सद्या सोशल मीडियावर ही क्लिप प्रचंड व्हायरल होत असून, मराठा समाजात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
राजकीय नेत्यांची नावं...
दोन समन्वयकांमध्ये झालेल्या संभाषणाच्या या कथित ऑडीओ क्लिपमध्ये राज्यातील महत्वाच्या नेत्यांची सुद्धा नावं घेण्यात आली आहे. भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या नावाचा यात उल्लेख केला गेला आहे. रमेश केरे हे या नेत्यांची भेट घेऊन पैसे घेऊन आल्याचा दावा सुद्धा या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. याबाबत रमेश केरे यांची बाजू आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र केरे यांचा फोन बंद असल्याने त्यांचाशी संपर्क होऊ शकला नाही.
महत्वाच्या बातम्या...
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चा धडकणार, छावा संघटनेचा इशारा
Amit Thackeray: अमित ठाकरे आजपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर