Ajit Pawar: औरंगाबादच्या विमानतळावर उतरताच अजित पवार थेट सिग्मा रुग्णालयात पोहचले, जखमी कार्यकर्त्याची घेतली भेट
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज औरंगाबादच्या (Aurangabad News) दौऱ्यावर आहेत.
Ajit Pawar: राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी आठ वाजेच्या दरम्यान त्यांचे चिखलठाणा विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेतेमंडळी आधीपासूनच उपस्थितीत होते. मात्र नेत्यांचे स्वागत स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी आपला ताफा थेट औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात वळवला. तसेच सिग्मा हॉस्पिटलमध्ये जाऊन पवारांनी जखमी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची भेट घेतली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर 31डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. तरमळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सिग्मा हॉस्पिटलमध्ये (Sigma Hospital Aurngabad) सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळे अजित पवारांनी दौऱ्यात उल्लेख नसतानाही आधी जखमी तरमळे यांची भेट प्रकृतीची विचारपूस केली.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Marathwada Teacher Constituency Elections) 12 जानेवारीला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी म्हणजेच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम काळे (Vikram Kale) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे आज माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार औरंगाबाद दौऱ्यावर आले असून, त्यांच्या उपस्थितीत काळे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान याचवेळी शहरात आल्यावर अजित पवारांनी सर्वातआधी सिग्मा हॉस्पिटल गाठत राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
विक्रम काळे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
सद्याचे राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान आमदार विक्रम काळे पुन्हा एकदा मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणूक लढवत आहे. गेल्या अठरा वर्षांपासून काळे हे शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे यावेळी देखील राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान अजित पवारांच्या उपस्थितीत आज दुपारी साडेबारा वाजता विक्रम काळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तसेच अजित पवार यांच्या उपस्थितीत गोदावरी पब्लिक हायस्कूल, एन-12 येथे जाहीर सभा देखील होणार आहे.
असा असणार अजित पवारांचा दौरा...
- सकाळी 06:00 वाजता: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल नं.२), मुंबई येथे आगमन
- 07.05 वाजता : विमानाने प्रयाण (एअर इंडिया एआय 499)
- 08:10 वाजता : औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
- 10: 00 वाजता: स्व. भानुदासराव चव्हाण सभागृह, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ, औरंगाबाद येथे आगमन
- 11.30 वाजता: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा व विद्यापरिषद निवडणुकीत उत्कर्ष पॅनलच्या विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ
- 11.30 वाजता: राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन
- 12.30 वाजता: विभागीय आयुक्त कार्यालयात आगमन आणि विक्रम काळे यांचा औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषद सदस्याच्या उमेदवारी पदाचा अर्ज दाखल करणार
- दुपारनंतर शहरातील गोदावरी पब्लिक हायस्कूल, एन-12 विवेकानंद नगर येथे प्रचार सभा होणार.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Gopichand Padalkar: पवार कुटुंबातील लोकं बावचळले, त्यांना मी 'सळो की पळो करून सोडलं'; पडळकरांची टीका