एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Aurangabad : पोलीस आयुक्त कार्यालयातचं महिलेने स्वतःला संपवलं; अखेर पाच लोकांवर गुन्हे दाखल

Aurangabad :एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एक पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. 

Aurangabad Crime News: शेजारच्या सोबत सुरू असलेल्या वादात स्वतःचा नवराच आपली साथ देत नसल्याने आणि बेदम मारहाण करत असल्याने औरंगाबादच्या सविता दीपक काळे नावाच्या महिलेने थेट पोलीस आयुक्त कार्यालयातच स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता याप्रकरणी औरंगाबादच्या वाळूज पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यात पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. 

मृत महिला सविता यांचा पती दीपक काळे चालक असून त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा सविता यांना संशय होता. यातून ती महिला, तिचा पती आणि मुलगा सविता यांच्यासोबत नेहमी भांडत होते.  विशेष म्हणजे यात त्यांना सविता यांचा पती साथ देत होता. अनेकदा दीपक काळे हा आपल्या पत्नीला मारहाण सुद्धा करायचा. त्यामुळे याबाबत वाळूज पोलीस ठाण्यात सविता यांनी गुन्हा सुद्धा दाखल केला होता. मात्र पोलीस दुर्लक्ष करता असल्याची सविताचा तक्रार होती. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या पायऱ्यावर जाऊन स्वतःला पेटवून घेतले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. 

यांच्यावर गुन्हा दाखल...

याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात पाच लोकांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात मयत महिलेचा पती दीपक मनोहर काळे ( वय 42 वर्ष, धंदा: ड्राइवर, र.मांडवा तालुका-गंगापूर,जिल्हा औरंगाबाद), शेजारी असलेले, अशोक तुकाराम शेळके (वय45 वर्ष,  धंदा-शेती), गोकुळ अशोक शेळके (वय- 20 वर्ष, धंदा- शिक्षण, सर्व राहणार: मांडवा तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) यांच्यासह अशोक शेळके यांच्या पत्नी आणि वाळूज पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 

मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद 

विशेष म्हणजे सविता यांना मारहाण करतानाचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. सविता यांच्या भावाने हा व्हिडिओ पोलिसांना दिला आहे. ज्यात सविता यांना खाली पाडून तीन-चार लोकं बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तर सततच्या मारहाणीला आणि छळाला कंटाळून सविता यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. 

पोलीस कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल...

शेजाऱ्यांसोबत सुरु असलेल्या वादाबाबत सविता यांनी अनकेदा वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले. मात्र असे असतांना पोलिसांकडून याची गंभीर दखल घेण्यात आली नाही. अनेकदा मागणी करूनही सविता यांच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुलर्क्ष केल्याचा आरोप सुद्धा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Shewale On Amit Shah Meeting |एकनाथ शिंदेंचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातीलEknath Shinde Vastav EP 109 : गुवाहाटीला जाणारे शिंदे आणि दरे गावात नाराज शिंदे- एक वर्तुळ पूर्णVinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचंABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 29 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Embed widget