एक्स्प्लोर

Burning Bike VIDEO: चालत्या इलेक्ट्रिक बाईकने घेतला पेट, काही क्षणात जळून खाक

Aurangabad Crime News: या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Aurangabad Burning Bike VIDEO: औरंगाबादच्या खुलताबाद शहरातील एका चौकात चालत्या इलेक्ट्रिक बाईकने पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे गाडीला आग लागल्याची बाब दुचाकीस्वाराच्या वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेत इलेक्ट्रिक बाईक पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तर या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, खुलताबाद शहरातील हाफिज खलील चौक येथील रहिवासी मनोज बारगळ हे त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीने शेतातून गावात येत होते. यावेळी शहरातील बॉम्बे हॉटेलजवळ आल्यावर त्यांना आपल्या इलेक्ट्रिक बाईकमधून जळाल्याचा वास येऊ लागला. त्यामुळे त्यांनी खाली उतरून पाहणी केली असता, गाडीत आग लागली होती. पाहता-पाहता आगीने मोठा भडका घेतला. 

दुचाकी काही क्षणात जळून खाक...

इलेक्ट्रिक बाईकमधून वास आल्याने काहीतरी गडबड असल्याचा संशय मनोज बारगळ यांना आला. त्यामुळे ते खाली उतरून पाहत असतानाच गाडीने मोठा पेट घेतला. गाडी विझवण्यासाठी काही प्रयत्न करण्यापूर्वीच आगीने मोठा भडका घेतला. त्यामुळे काही क्षणात इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाली. तर मनोज बारगळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

नागरिकांची गर्दी...

खुलताबाद शहरातील बॉम्बे हॉटेल परिसरात नेहमीच गर्दी असते. त्यामुळे मनोज बारगळ यांच्या इलेक्ट्रिक बाईकला आग लागताच पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. चालत्या गाडीने अचानक पेट घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तर काहींनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुद्धा केला. पण आगीचा भडका अधिक असल्याने आग वीजवने शक्य नव्हते. 

दोन दिवसांपूर्वी एसटी बसला आग...

इलेक्ट्रिक बाईकला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मात्र अशीच घटना दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील ढोरेगाव येथे समोर आली होती. एका चालत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेत बारा ते पंधरा प्रवाशांना बाहेर काढले. यावेळी लागलेल्या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या...

Aurangabad: कंटेनर चालकाची नियत फिरली, 20 लाखांच्या व्हिस्कीसह ट्रकच पळवला

Aurangabad:काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, पोलीस आयुक्तालयाच्या बाजूलाच सुरु होता अड्डा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे आज राजीनामा देणार की घेतला जाणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता
धनंजय मुंडे आज राजीनामा देणार की घेतला जाणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता
Gautam Gambhir : त्यावेळी निर्णय घेताच चर्चा झाली, टीकाही भरपूर झाली, पण टीम इंडियाच्या वस्तादांनी एक डाव राखून ठेवला अन् बरोबर सेमीफायनलपूर्वी टाकला!
त्यावेळी निर्णय घेताच चर्चा झाली, टीकाही भरपूर झाली, पण टीम इंडियाच्या वस्तादांनी एक डाव राखून ठेवला अन् बरोबर सेमीफायनलपूर्वी टाकला!
Pune Crime Swargate: तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
Raksha Khadse: रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात;  मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Budget Session Assembly : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, अजित पवारांसमोर कोणती आव्हानं?Raksha Khadse Daughter : रक्षा खडसेंच्या मुलीसह मैत्रिणीची छेड काढणाऱ्या तिघांना अटकTop 70 News : Superfast News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7 AM : ABP MajhaIndia Vs New Zealand : Rohit Sharma चा भारतीय संघ मोठ्या रुबाबात उपांत्य फेरीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे आज राजीनामा देणार की घेतला जाणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता
धनंजय मुंडे आज राजीनामा देणार की घेतला जाणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता
Gautam Gambhir : त्यावेळी निर्णय घेताच चर्चा झाली, टीकाही भरपूर झाली, पण टीम इंडियाच्या वस्तादांनी एक डाव राखून ठेवला अन् बरोबर सेमीफायनलपूर्वी टाकला!
त्यावेळी निर्णय घेताच चर्चा झाली, टीकाही भरपूर झाली, पण टीम इंडियाच्या वस्तादांनी एक डाव राखून ठेवला अन् बरोबर सेमीफायनलपूर्वी टाकला!
Pune Crime Swargate: तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
Raksha Khadse: रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात;  मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
Pune Crime Swargate bus depot: काय करायचंय ते कर पण मला जिवंत सोड, तरुणी घाबरल्याने दत्तात्रय गाडेचा आत्मविश्वास वाढला, दुसऱ्यांदा शरीराचे लचके तोडले
'काय करायचंय ते कर पण मला जिवंत सोड', तरुणी घाबरल्याने दत्तात्रय गाडेचा आत्मविश्वास वाढला, दुसऱ्यांदा शरीराचे लचके तोडले
Rohit Sharma : रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्ध मोठा डाव खेळला, वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात किवी फलंदाजांची दैना 
रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला, वरुणनं जाळं टाकलं अन् मायदेशातील पराभवाचा वचपा काढला 
Embed widget