एक्स्प्लोर

Marathwada Rain: मराठवाड्यात दमदार पाऊस; वीज कोसळून सहा ठार

औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

Marathwada Rain News: शनिवारी मराठवाड्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र याचवेळी निसर्गाची अवकृपा सुद्धा पाहायला मिळाली.अंगावर वीज पडून जालना जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला तर, दोन जण जखमी झाले. औरंगाबाद जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून, नांदेड जिल्ह्यात एक जण जखमी झाला. 

औरंगाबादेत तिघांचा मृत्यू 

औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील सावखेडा (उटाडेवाडी) येथील गट क्रमांक 292 मध्ये संजय नथ्थू उटाडे (45) हे आपल्या शेतात ठिबक सिंचनाच्या पाईपलाइनचे काम करत असताना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.  तर दुसऱ्या घटनेत पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथे अंगावर वीज पडून गजानन हरिश्चंद्र दराडे (27) या तरुणाचा मृत्यू झाला. तसेच आडगाव जावळे येथे दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी सांडू शामराव नजन यांच्या घरावर वीज पडल्याने त्यांची बहीण सरुबाई शहादेव लांडे ( वय 40 वर्षे) यांचा मृत्यू झाला. 

जालन्यात निसर्गाची अवकृपा

जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील कोदा येथे शनिवारी महिला शेतकरी गंगाबाई पांडुरंग जाधव, मुलगा दत्ता पांडुरंग जाधव, भारती गजानन जाधव हे तिघे शेतात काम करत होते. दरम्यान, अडीच वाजेच्या सुमारास वीज पडल्याने गंगाबाई पांडुरंग जाधव यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्याबरोबर असलेले दत्तात्रय जाधव व भारती जाधव हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंठा तालुक्यातील पेवा येथील शेतकरी अनिल भारत शिंदे (22) शनिवारी आपल्या शेतात काम करीत असताना विजेचा कडकडाट सुरू झाला. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत माळकिणी येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना वसंत वामनराव जाधव (50) यांच्या अंगावर वीज पडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे विजेचा  कडकडाट सुरु असताना शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. 

 

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
Prakash Mahajan on Prithviraj Chavan: सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget