Coronavirus Update : देशात गेल्या 24 तासांत 30,256 नवे कोरोनाबाधित; सर्वाधिक रुग्ण केरळात
India Coronavirus Updates : देशात गेल्या 24 तासांत 30,256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 295 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच उपचारानंतर 43,938 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
India Coronavirus Updates : देशात सलग पाचव्या दिवशी 30 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 295 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच उपचारानंतर 43,938 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या 7 दिवसांची कोरोनाची आकडेवारी :
13 सप्टेंबर : 25,404
14 सप्टेंबर : 27,176
15 सप्टेंबर : 30,570
16 सप्टेंबर : 34,403
17 सप्टेंबर : 35,662
18 सप्टेंबर : 30,773
19 सप्टेंबर : 30,256
अर्ध्याहून अधिक कोरोना रुग्ण केरळात
केरळात रविवारी कोरोनाच्या 19,653 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढून 45 लाख 8 हजार 493 वर पोहोचली आहे. कोरोनामुळ काल 152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत कोरोनामुळं जीव गमावलेल्या रुग्णांचा आकडा वाढून 23,591 इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत 26,711 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा 43 लाख 10 हजार 674 इतका झाला आहे.
देशातील एकूण कोरोनाची आकडेवारी
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 34 लाख 78 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 45 हजार 133 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 27 लाख 15 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 18 हजार 181 रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.
कोरोनाची सद्यस्थिती :
कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 34 लाख 78 हजार 419
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 27 लाख 15 हजार 105
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 18 हजार 181
एकूण मृत्यू : चार लाख 45 हजार 133
देशातील एकूण लसीकरण : 80 कोटी 85 लाख 68 हजार डोस
राज्यात काल (सोमवार) 3413 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 8326 रुग्ण कोरोनामुक्त
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात काल 3,413 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 36 हजार 887 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.16 टक्के आहे.
राज्यात काल 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11, 720 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 42 हजार 955 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,70,28,476 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,21,915 (11.44 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,81,561 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,752 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 420 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 420 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 523 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,14,947 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 36 हजार 018 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4629 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1222 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सध्या 45 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शुन्य आहेत.