एक्स्प्लोर

चोरीचं पाप धुण्यासाठी समाजकार्य, बुलडाण्याच्या चोराला औरंगाबादेत बेड्या

औरंगाबादेत चोऱ्या करुन बुलडाण्यातील चोराने गावात 'मामा' नावाची संस्था स्थापन केली. तिथे सामूहिक विवाह लावले, गावाला टँकरने पाण्याची सोय केली, तसंच शाळेसाठीही काम केलं.

औरंगाबाद : चोरी करायची आणि मिळालेल्या पैशातून समाजकार्य करायचं, हा टिपीकल 'रॉबिनहूड' फंडा. चित्रपटांमध्ये दिसणारा हा सीन औरंगाबादेत मात्र प्रत्यक्षात पाहायला मिळाला. सव्वाशेपेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला बुलडाण्याचा चोर किशोर वायाळला औरंगाबाद पोलिसांनी गजाआड केलं, त्यावेळीही चोरीच्या पैशातून शिर्डी संस्थानाला दान करण्याच्या तयारीत असल्याचं त्याने सांगितलं. किशोर वायाळचं काम चोरीचं, मात्र आव समाजसेवकाचा. वैजापूरच्या एका घरातून तब्बल 72 तोळं सोनं त्याने चोरलं. पोलिसांनी बऱ्याच मेहनतीनंतर किशोर वायाळला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून सोनं हस्तगत केलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली त्यावेळेस अनेक गोष्टी समोर आल्या. किशोर वायाळ मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील मेरा गावचा. गावात त्याचं आलिशान घर आहे. इतकंच नाही, तर तीन महागड्या गाड्याही आहेत. धक्कादायक म्हणजे त्याचं राज्यासह राज्याबाहेरही नेटवर्क आहे. चोरीला जाताना तो स्थानिक नेटवर्कमधील चोराला सोबत घ्यायचा. त्याला दिवसाला एक हजार रुपये आणि चोरीच्या पैशांतून बक्षिसही द्यायचा. त्याने अनेक ठिकाणी कामासाठी असे 'चोर' ठेवले होते. चोरी करताना तो दुपारची वेळ निवडायचा. साथिदारांकडून घरात कुणी नाही, याची माहिती घ्यायचा. त्यानंतर घर फोडून चोरी करण्याची त्याची पद्धत होती. चोरी केल्यानंतर पापक्षालनासाठी तो पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करायचा. चोरीचा मुद्देमाल विकून तो आपल्या गावात यायचा. मात्र गावात त्याचं वेगळंच रुप होतं. समाजसेवकाचा आव आणून तो लोकांना मदत करायचा. त्याने 'मामा' नावाची एक संस्थाही स्थापन केली होती. यातून त्याने गावात सामूहिक विवाह लावले, गावाला टँकरने पाण्याची सोय केली. गावातील शाळेसाठीही काम केलं. चोरीच्या एकूण रकमेतून तो किमान 10 टक्के समाजकार्य, दानधर्मासाठी सुद्दा करायचा. ज्या 72 तोळे सोनं चोरीत तो गजाआड गेला, त्या चोरीच्या पैशातून तो शिर्डीच्या साई संस्थानला रुग्णवाहिकाही दान करणार होता. मात्र पोलिसांनी तपास करत शिताफीने त्याला अटक केली आणि हा सगळा प्रकार समोर आला. त्याच्यावर औरंगाबादबाहेरही तब्बल 123 गुन्हे दाखल आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
Prakash Mahajan on Prithviraj Chavan: सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget