एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बापटांची कर्तव्यात कसूर, मंत्रिपदाचा गैरवापर केला : हायकोर्ट
2016 च्या एका प्रकरणात तत्कालीन तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांनी काही स्वस्त धान्याची दुकानांची चौकशी करुन नियमाची पायमल्ली करत असल्याने बंद केली होती.
औरंगाबाद : स्वस्त धान्य दुकानाच्या संबंधित एका निकालाच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका खंडपीठाने गिरीश बापट यांच्यावर ठेवला आहे.
2016 च्या एका प्रकरणात तत्कालीन तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांनी काही स्वस्त धान्याची दुकानांची चौकशी करुन नियमाची पायमल्ली करत असल्याने बंद केली होती. मात्र हाच निर्णय गिरीश बापट यांनी रद्द करुन त्या दुकानदारांना पुन्हा एकदा संधी दिली होती.
याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती आणि याचिकेवर निकाल देताना खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. चौकशीनंतर कारवाई केली तर ती योग्य आहे आणि तो निर्णय मंत्र्यांनी का रद्द करावा हे कळत नाही, असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. गिरीष बापटांनी कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच बापटांनी घेतलेला निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
Advertisement