एक्स्प्लोर
Advertisement
राज्यात वर्षाला 18 हजार दुचाकी चोरीला जातात
दर वर्षाला राज्यात तब्बल 18 हजार (महिन्याला 1 हजार 500) मोटरसायकल चोरीला जातात. मोटारसायकल चोरीचे सर्वाधिक प्रमाण हे पुणे आणि औरंगाबादमध्ये आहे.
मुंबई : दर वर्षाला राज्यात तब्बल 18 हजार (महिन्याला 1 हजार 500) मोटरसायकल चोरीला जातात. मोटारसायकल चोरीचे सर्वाधिक प्रमाण हे पुणे आणि औरंगाबादमध्ये आहे. औरंगाबाद शहरातून प्रतिदिन सरासरी 3 वाहने चोरीला जातात. मध्यमवर्गीय आणि गरिबांना या वाढत्या वाहन चोऱ्यांचा फटका बसत आहे.
औरंगाबाद शहराची मोटारसायकलचे शहर म्हणून नवी ओळख तयार होत आहे. या शहरात दररोज 8 लाख लोक मोटारसायकलवरुन प्रवास करतात. शहरात दर महिन्याला एक हजार मोटारसायकल खेरेदी केल्या जातात. शहरात मोटारसायकलची संख्या वाढली, त्यासोबतच मोटारसायकल चोरीचे प्रमाणदेखील वाढले. या औद्योगिक शहरात प्रत्येक दिवसाला मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे दाखल होतात.
2018 या वर्षात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल 745 वाहने चोरीला गेल्याची नोंद आहे. त्यापैकी केवळ 169 वाहने चोरट्यांकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. यावर्षी जानेवारी ते जूनअखेरपर्यंत तब्बल 450 वाहने चोरट्यांनी लंपास केली आहेत.
राज्यात वर्षाकाठी 18 हजार मोटारसायकलची चोरी होते. म्हणजेच महिन्याला दिड हजार मोटार सायकलची चोरी होते. मोटारसायकल चोरीच्या प्रमाणात पुण्याचा पहिला तर औरंगाबादचा दुसरा नंबर लागतो. मोटारसायकल तयार करणाऱ्या कंपन्या मोटारसायकल चोरीचे प्रमाण रोखता येईल, अशी यंत्रणा तयार करु शकले नाहीत, त्यामुळेच मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत आहे.
अपुरी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था आणि रिक्षाचा महागलेला प्रवास परवडत नसल्याने गरिबांपासून श्रीमंतांना दुचाकी बाळगणे परवडते. वेळप्रसंगी कर्ज घेऊन अथवा पोटाला चिमटा काढून जमवलेल्या पैशातून मोटारसायकल खरेदी केली जाते. त्यामुळे मोटारसायकल चोरीला गेली तर त्याचा सर्वसामान्य व्यक्तीला मोठा फटका बसतो. त्यामुळे राज्यातील मोटारसायकल चोरीचे प्रमाण चिंता व्यक्त करणारे आहे. हे असेच होत राहीले, मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत गेले तर त्यासाठी पोलिसांचा स्वतंत्र सेल निर्माण करण्याची वेळ येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement